शेत पिकाची पाहणी व पंचनामे करून शेकऱ्यांना सोयबीन पिकांचे नुकसान भरपाई द्या.

HomeNewsनागपुर डिवीजन

शेत पिकाची पाहणी व पंचनामे करून शेकऱ्यांना सोयबीन पिकांचे नुकसान भरपाई द्या.

आम आदमी पार्टीचे वतीने तहसीलदार यांना निवेदनाद्वारे केली मागणी

गौतम नगरी चौफेर (राजेश येसेकर भद्रावती तालुका प्रतिनिधी) भद्रावती : तालुक्यातील स्थानिक वाघेडा(से.) धामनी,सागरा,आगरा,खोकरी, बेलगाव, मसाळ, पिर्लि, धानोली, मांगली, परिसरात गेल्या तिन दिवसापासून परतीच्या पावसाने मोठ्या प्रमाणात हजेरी लावली या परतीच्या पावसाने शेतामध्ये असलेले सोयाबीन पीक हे धोक्यात आले असून शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात आर्थिक नुकसान होत असल्याचे दिसत आहे त्यामुळे भद्रावती तालुक्यातील शेतकरी मोठा अडचणीत सापडला असून चिंताग्रस्त असल्याचे पाहायला मिळत आहे तेव्हा परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांची शेती पिकाची प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामे करून शासनाने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी आम आदमी पार्टी तालुका भद्रावतीच्या वतीने करण्यात आली.

  याबाबत सविस्तर माहिती असे की गेल्या तीन दिवसांमध्ये भद्रावती तालुक्यामधील वाघेडा, सागरा, बेलगाव, पिरली, मांगली. व अन्य गावामध्ये परतीच्या पावसाने मेघ गर्जनासह हजेरी लावली असल्याने सध्या शेतामध्ये सोयाबीन हे पीक उभे असून काही शेतकऱ्यांची कापणी झाली तर काहींचे पीक उभे आहे तर काही शेतकऱ्यांची पीक ढीग लागले आहे. परंतु या पावसाने सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने हाती आलेले पीक कायमचे नष्ट होत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. आधीच शेतकऱ्यांनी पीक मशागतीसाठी तसेच बी बियाणे खरेदीसाठी कर्जबाजारी होऊन आपली शेती फुलवली परंतु या अवकाळी पावसाने हाती आलेली पीक नष्ट होत असल्याने येथील शेतकरी अधिकच चिंताग्रस्त यासोबत हवालदिल झाला आहे. तरी आपणास कळकळीची विनंती आहे की, लवकरात लवकर तालुक्यातील सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अन्यथा आम आदमी पार्टी भद्रावती तालुकाच्या वतीने तालुक्यातील शेतकऱ्यांना घेऊन तहसील कार्यालया समोर जनआंदोलन उभे करण्यात येईल व याची सर्वस्व जबाबदार आपली राहिल असा इशारा सुरज खंगार तालुका अध्यक्ष आम आदमी पार्टी यांनी दिला आहे.

COMMENTS