युवा नेतृत्व शिबिर विद्यार्थ्यांमध्ये सुसंस्कार रुजवते – सुभाष धोटे

HomeNewsनागपुर डिवीजन

युवा नेतृत्व शिबिर विद्यार्थ्यांमध्ये सुसंस्कार रुजवते – सुभाष धोटे

गौतम नगरी  चौफेर  कोरपना : महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय, गडचांदूरच्या राष्ट्रीय सेवा योजना (रासेयो) विभागाच्या वतीने कोरपना तालुक्यातील वडगाव येथे युवा नेतृत्व शिबिराचे आयोजन करण्यात आले. अशा शिबिरातून विद्यार्थ्यांमध्ये सुसंस्कार रुजवून समाजासाठी आदर्श नेतृत्व घडविण्याचा उद्देश पूर्ण होत असल्याचे मत माजी आमदार तथा गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ, गडचांदूरचे अध्यक्ष सुभाष धोटे यांनी व्यक्त केले.

        शिबिराचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. प्रमुख उपस्थितीमध्ये संस्थेचे उपाध्यक्ष विठ्ठल थीपे, सचिव धनंजय गोरे, प्राचार्य साईनाथ मेश्राम, उपप्राचार्य प्रफुल माहुरे, उपसरपंच सुदर्शन डवरे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष श्रीराम भोंगळे, शाळा समितीचे अध्यक्ष मुकेश निमकर, उपाध्यक्ष प्रियंका उरकुडे, भास्कर तुरानकर, कैलाश मेश्राम, वसंता गोरे, काकासाहेब नागरे, राहुल गाडवे यांच्यासह गावातील नागरिक उपस्थित होते.
         कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. आशिष देरकर यांनी केले, प्रास्ताविक प्राचार्य साईनाथ मेश्राम यांनी केले तर आभार राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक प्रा. प्रदीप परसुटकर यांनी मानले.

COMMENTS

You cannot copy content of this page