उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जलपर्यटन प्रकल्पाची पाहणी केली

HomeNewsनागपुर डिवीजन

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जलपर्यटन प्रकल्पाची पाहणी केली

गौतम नगरी चौफेर (संजीव भांबोरे भंडारा) – दि.28 राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज भंडारा जिल्हयातील  वैनगंगा कोरंबी येथील जलपर्यटन प्रकल्पाची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल, आमदार नरेंद्र भौंडेकर, अतिरीक्त जिल्हाधिकारी राजेंद्रकुमार जाधव, पोलीस अधिक्षक नुरुल हसन, निवासी उपजिल्हाधिकारी लीना फलके, अधिक्षक अभियंता राजेश पाटील, मुख्याधिकारी करणकुमार चव्हाण उपस्थित  होते.
जिल्हयातील कोरंबी गावाजवळ वैनगंगा नदीवर प्रस्तावित जलपर्यटन प्रकल्पाचे काम सुरू असून या कामाला आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी आमदार नरेंद्र भौंडेकर यांनी या प्रकल्पाविषयी माहिती दिली. विदर्भात जलपर्यटनाला वाव असुन  या प्रकल्पाचे काम दर्जेदार व्हावे, अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री एकनाथ. शिंदे यांनी व्यक्त केली.
त्यानंतर भंडारा शहरातील खांब तलाव परिसरातील भव्य प्रभु श्रीराम मुर्तीचे त्यांनी दर्शन घेतले. सोबतच परिसरातील कामाची पाहणी करून रेल्वे मैदानावरील नियोजित सभेकडे रवाना झाले. तत्पुर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व वित्त राज्यमंत्री ॲङ आशिष जयस्वाल यांचे आज एमआयईटी महाविदयालय, शहापूर येथील परिसरात हेलीकॉप्टरने आगमन झाले. त्यांच्या स्वागताला आमदार नरेंद्र भौंडेकर, अतिरीक्त जिल्हाधिकारी राजेंद्रकुमार जाधव ,पोलीस अधिक्षक नुरुल हसन, उपस्थित होते. गोसेखुर्द जलाशय मौजा मौदी जिल्हा भंडारा येथे जागतिक दर्जाचे पर्यटन विकास करण्यात येत आहे .या प्रकल्पात नाविन्यपूर्ण जल पर्यटन केंद्र, बोटीसाठी आणि पर्यटकांसाठी रॅम्प ,पर्यटनकांसाठी आसन व्यवस्था, वाहनतळ ,उपहारगृह ,बगीचा ,पर्यटकांसाठी विविध सुविधा ,गावांना आणि इतर पर्यटन स्थळांना जोडण्यासाठी ठिकठिकाणी जेट्टी उभारण्यात येत असून एप्रिल 2026 पर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

COMMENTS

You cannot copy content of this page