गौतम नगरी चौफेर (संजीव भांबोरे भंडारा (जिल्हा प्रतिनिधी) – भंडारा पवनी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी आज दिनांक 29 नोव्हेंबर 2024 ला दुपारी 2 वाजता निवडणुकीत विजयी झाल्यानंतर प्रथमच पहेला ग्रामपंचायतला भेट दिली. यावेळी पहेला येथे नागरिकांनी ग्रामपंचायतच्या मुख्य प्रवेशद्वारावर फटाक्यांची आतीष बाजी करून हार घालून त्यांचे स्वागत करण्यात आले. त्याचप्रमाणे ग्रामपंचायत सरपंच मंगला ठवकर यांनी त्यांचा शाल , श्रीफळ, व पुष्पगुच्छ देऊन ग्रामपंचायत कार्यालयात सत्कार केला. व प्राथमिक आरोग्य केंद्र विषयी समस्यांचे निवेदन दिले. यावेळी ग्रामपंचायत उपसरपंच सुशील बांडेबुचे, प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे, दयानंद नखाते , सुनील शेंडे ग्रामपंचायत सदस्य,ग्रामपंचायतचे पदाधिकारी, पोलीस पाटील चंद्रशेखर खराबे, विनोद भोयर, जयश्री वंजारी, विनोद वंजारी, कुलदीप गंधे, दीपक वानखेडे, अतुल वानखेडे, व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
COMMENTS