गौतम नगरी चौफेर – कोरपना तालुक्यातील पैनगंगा व वर्धा नदीपात्रातून महसूल प्रशासनाच्या आशीर्वादाने मोठ्या प्रमाणात रेती तस्करी सुरू असल्याच्या बातम्या मागील काही दिवसांपासून सातत्याने प्रकाशित होत आहेत. हजारो ब्रास रेती नद्या पोखरून उचलली जात असल्याचे वास्तव समोर येताच कोरपना महसूल प्रशासन खडबडून जागे झाले आहे. या पार्श्वभूमीवर मुरूम वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभागाकडून कारवाई करण्यात आली. मात्र हायवा वाहनांद्वारे सुरू असलेल्या मोठ्या प्रमाणातील रेती तस्करीत गुंतलेले मोठे मासे अजूनही महसूल प्रशासनाच्या गळाला लागले नसल्याची माहिती आहे. कोरपना तहसीलदारांनी महसूल पथक सक्रिय केले असले तरी अद्यापपर्यंत रेती तस्करांवर ठोस व मोठी कारवाई झालेली दिसून येत नाही. कोरपना, गडचांदूर, वनसडी, नांदा, उपरवाही व बिवी या परिसरांतील विविध बांधकाम ठिकाणी हायवा वाहनांद्वारे रेतीचे मोठमोठे डिग खुलेआम पडून असल्याचे चित्र आहे.
वर्धा व पैनगंगा नदीपात्रातून हजारो ब्रास रेतीची तस्करी करणान्या मोठ्या तस्करांच्या मुसक्या आवरण्यात कोरपना महसूल विभागाला अद्याप यश आलेले नाही. महसूल प्रशासना-कडून केव्हा ठोस कारवाई होते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
झोटिंग घाटातील रेती तस्करांवर कारवाई कधी होणार?
हजारो ब्रास रेती चोरी; रस्ता बंद, पण चौकशी मात्र शून्य
COMMENTS