केंद्रस्तरीय नवरत्न स्पर्धा पुडीयाल मोहदा येथे संपन्न

HomeNewsनागपुर डिवीजन

केंद्रस्तरीय नवरत्न स्पर्धा पुडीयाल मोहदा येथे संपन्न

गौतम नगरी चौफेर (चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी, कृष्णा चव्हाण जिवती) –दिनांक 20. डिसेंबर 2024 रोजी , वणी (बु) केंद्रातील नवरत्न स्पर्धा जी. प.उच्च. प्राथ. पुडीयाल मोहदा येथे पार पडल्या. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष – मान. हरेश्र्वर तुळशीराम पुष्पपोळ (शा. व्य. स. अध्यक्ष) पुडीयाल मोहदा हे होते. सदर स्पर्धांचे आयोजन मान. श्री. रामकिसन गायकवाड सर ,केंद्रप्रमुख – वणी ( बु ) व मान श्री. राजाराम घोडके सर, मुख्याध्यापक जी. प.उच्च. प्राथ. शाळा पुडीयाल मोहदा हे होते. सदर स्पर्धे मधे वणी केंद्रातील सर्व जिल्हापरिषद प्राथमिक व उच्च. प्राथमिक शाळांनी सहभाग घेतला.  सर्व स्पर्धक शाळाचे नियोजित वेळेत आगमन व नाव नोंदणी झाली.
छोटेखानी पण आकर्षक उद्घाटन सोहळा पार पडला. उद्घाटन सोहळ्यात मान.रामकिसन गायकवाड सरांनी नावीन्यपूर्ण नवरत्न स्पर्धेची माहिती दिली. व सर्व स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. लगेच सर्व प्राथमिक व उच्च प्राथमिक स्पर्धांना सुरुवात झाली. चित्रकला स्पर्धा, सुंदर हस्ताक्षर स्पर्धा, बुद्धिमापन स्पर्धा, स्मरणशक्ती स्पर्धा, या स्पर्धांसाठी नाम फलकासह स्वतंत्र कक्षाची सोय कारण्यात आली होती.
उर्वरित स्पर्धा महणजेच कथाकथन, भाषण, वादविवाद, व एकपात्री या स्पर्धा मुख्य स्टेजवर घेण्यात आल्या. सर्वच स्पर्धांसाठी उतं नियोजन व परीक्षण करण्यात आले. सर्व स्पर्धा व्यवस्थित पार पाडण्यात आल्या नंतर बक्षीस वितरण करण्यात आले.
यात पुडियाल मोहदा शाळेने सर्वच स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून वणी (बु) बिटातून उत्कृष्ठ शाळेचा मान पटकावला. बक्षिस वितरण सोहळ्यात सर्वच शाळांचे मुख्याध्यापक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. स्पर्धेत विजेत्या व उपविजेत्या स्पर्धकांना केंद्रातर्फे प्रमाणपत्र , बक्षीस व पुष्पगुच्छ देवून सन्मान करण्यात आला.
मान. केंद्र प्रमुख गायकवाड सरांनी अध्यक्षीय भाषणात सर्व स्पर्धकांचे कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. स्पर्धेदरम्यान पुडीयाल मोहदा शाळेकडून सर्व सहभागी विद्यार्थी व शिक्षकांसाठी उत्तम जेवण व चहाची व्यवस्था करण्यात आली.
उद्घाटनिय कार्यक्रमाचे व बक्षीस वितरणाचे यशस्वी व प्रभावी सूत्रसंचालन मान. महेश लबडे सर , पुडीयाल मोहदा यांनी केले .तर स्पर्धे दरम्यान मान. विकी मेश्राम सर सेवादास नगर यांनी उत्कृष्ट सूत्रसंचालन केले. तर आभाप्रदर्शन मान. रवींद्र कन्नाके सर  नोकेवडा यांनी केले. या नावीन्यपूर्ण नवरत्न स्पर्धा आयोजनासाठी मान. श्री. रामकिसन गायकवाड सर केंद्रप्रमुख वणी (बु ), शाळेचे मुख्याध्यापक श्री. राजाराम घोडके सर, विषय शिक्षक श्री. बालाजी सोळंके सर, स.शिक्षक श्री.राजेंद्र बनकर सर, व शिक्षण सेवक महेश लबडे सर, मान.श्री. निखिल इंगळे सर वणी (बू), ( उच्च. प्राथ. स्पर्धा प्रमुख), मान.श्री. प्रणय पद्मगिरीवर सर परमडोली शाळा (प्राथ. स्पर्धाप्रमुख) , तसेच प्रमाणपत्र लेखनासाठी मान. रवींद्र कन्नाके सर नोकेवाडा शाळा या सर्वांनी उत्तम सहकार्य करून आजच्या केंद्रस्तरिय नवरत्न स्पर्धा यशस्वीपणे पार पाडल्या. तसेच उच्च प्राथमिक. व प्राथमिक गटातील सर्व पर्यावेक्षकानी आपली जबाबदारी यशस्वी पणे पार पडली. अश्या रीतीने वणी केंद्रातील नवरत्न पुडीयाल मोहादा शाळेत पार पडल्या.

COMMENTS

You cannot copy content of this page