प्रबोधनकार संघटनेच्या वतीने साकोली येथे रक्तदान शिबीर २६ रोजी

HomeNewsनागपुर डिवीजन

प्रबोधनकार संघटनेच्या वतीने साकोली येथे रक्तदान शिबीर २६ रोजी

राजर्षी शाहू महाराज जयंतीचे औचित्य

गौतम नगरी चौफेर संजीव भांबोरे भंडारा –प्रबोनकार कला साहित्य संघटना साकोलीच्या वतीने दि. २६ जून २०२५ रोजी राजर्षी शाहू महाराज जयंती निमित्ताने डाॅ.बाबासाहेब आंबेडकर तालुका स्मारक समिती येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. त्या निमित्ताने नुकतीच संघटनेची नियोजन बैठक शासकीय विश्रामगृहात आयोजित करण्यात आली होती.

      या बैठकीप्रसंगी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भावेश कोटांगले, साकोली तालुका अध्यक्ष धनंजय  धकाते, ता. समन्वयक उमेश भोयर, सचिव यशवंत बागडे, संचालक सोनू मेश्राम, प्रल्हाद भुजाडे, संदीप नागदेवे, संजू दाणे, विनोद मुरकुटे, इंद्रजित लांजेवार आदी उपस्थित होते. रक्तदानात सहभाग घेणार्‍या व्यक्तींनी आयोजकांकडे अगोदरच नोंदणी करावी असे आवाहन यावेळी करण्यात आले.

      रक्तदान शिबीराचे उदघाटन तहसिलदार निलेश कदम यांच्या हस्ते पार पडेल.अध्यक्षस्थानी जि. प. समाजकल्याण सभापती शितल राऊत असतील. अतिथी म्हणून नायब तहसिलदार शामराव शेंडे, माजी सभापती मदन रामटेके, आगार प्रमुख सचिन आगरकर, पं.स.सभापती ललीत हेमणे, पो.नि. महादेव आचरेकर, विजय नंदागवळी, वैद्यकीय अधिक्षक संदिप गजभिये, सामाजिक कार्यकर्ता परमानंद मेश्राम, स्मारक समितीचे अध्यक्ष दिपक साखरे, किशोरभाऊ चन्ने सा. कार्यकर्ता आदी उपस्थित असतील.जास्तीत जास्त रक्तदात्यांनी सहभाग घ्यावा असे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे. 

COMMENTS

You cannot copy content of this page