मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी केलेल्या पाठपुराव्याला यश
गौतम नगरी चौफेर (मालेगाव (संजीव भांबोरे) – येथील सुप्रसिध्द राष्ट्रकवी, लेखक व समीक्षक संजय मुकूंदराव निकम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुंबई येथे औपचारिक भेट घेतली. त्या भेटीत राष्ट्रकवी संजय मुकूंदराव निकम ह्यांनी ‘मेरा भारत’ हा हिंदी काव्यसंग्रह मोदी ह्यांना सप्रेम भेट दिला. त्यावेळी राष्ट्रकवी संजय मुकूंदराव निकम ह्यांनी महाराष्ट्राची मायबोली मराठी आहे. तरी आपण वैयक्तिक लक्ष घालून महाराष्ट्राची राजभाषा असलेल्या माय मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून द्यावी अशी विनंती केली.
मराठी भाषा यासाठीचे सारे निकष पुर्ण करते. त्यामुळे अभिजात भाषेचा दर्जा देण्यात यावा या मागणीला केंद्र सरकारने मान्यता दिली आणि पंतप्रधान मोदींनीही होकार दिला. त्याप्रमाणे महाराष्ट्र राजभाषा माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला ही घोषणा दि. ३/१०/२०२४ रोजी केंद्र सरकारने केली आणि मराठी राजभाषा अभिजात दर्जाची भाषा म्हणून सन्मानीत झाली.
राष्ट्रकवी संजय मुकूंदराव निकम ह्यांनी केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले. त्यामुळे देशभरातून आणि महाराष्ट्रातून त्यांचे कौतुक होत आहे. त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे. त्यांचा ‘महाराष्ट्र भूषण मायमराठी’ हा काव्यसंग्रह ही त्यांनी पंतप्रधान मोदी यांना भेट दिला. मोदींनी त्याबद्दल त्यांचे कौतुक केले आणि मेरा भारत साठी शुभेच्छा दिल्या.
COMMENTS