इन्फंट काँन्व्हेंट च्या खेळाडूंची विभागीय सॉफ्ट टेनिस स्पर्धेसाठी निवड.

HomeNewsनागपुर डिवीजन

इन्फंट काँन्व्हेंट च्या खेळाडूंची विभागीय सॉफ्ट टेनिस स्पर्धेसाठी निवड.

जिल्हास्तरीय स्पर्धेत विविध गटांत प्रथम व द्वितीय क्रमांक ; सेपक टकरामध्येही विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी.
गौतम नगरी चौफेर बादल बेले राजुरा, दि.१२
ऑक्टोबर चंद्रपूर येथील जिल्हास्तरीय क्रीडा संकुलात १० ऑक्टोबर २०२६ रोजी पार पडलेल्या जिल्हास्तरीय सॉफ्ट टेनिस स्पर्धेत राजुरा येथील इन्फंट जीजस इंग्लिश पब्लिक हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत विविध गटांत प्रथम व द्वितीय क्रमांक पटकाविले. या यशाच्या जोरावर अनेक विद्यार्थ्यांनी विभागीय स्तरावरील सॉफ्ट टेनिस स्पर्धेसाठी आपली निवड निश्चित केली असून, शाळेच्या क्रीडा क्षेत्रातील यशात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. १४ वर्षांखालील मुलांच्या गटात नयन गजानन इटनकर, पूरब सत्यपाल सातपुते, रुवेल राजू मुचे, श्लोक राकेश करडभुजे आणि हर्षवर्धन रमेश इटनकर यांनी प्रथम क्रमांक मिळविला. याच वयोगटातील मुलींच्या गटात दूर्वा बादल बेले, माही आशिष चुंबळे आणि हार्दिका विलास तुमाने यांनी प्रथम क्रमांक पटकाविला.

तसेच १७ वर्षांखालील मुलांच्या गटात अथर्व चरणदास देवाळकर, ओम राजेश उलमाले, प्रणित विजय पिंपळकर, भव्यांश मिलन करदोडे आणि सोहम सुनील पायपरे यांनी प्रथम क्रमांक मिळवत आपले कौशल्य सिद्ध केले. १७ वर्षांखालील मुलींच्या गटात अविका मारुती चिंचोलकर, निहारिका शारदा भलमे, मैथिली प्रमोद जल्लेवार, हर्षदा मनोज डाहुले आणि स्मृती सतीश राजुरकर यांनी द्वितीय क्रमांक पटकाविला. दरम्यान, सेपक टकरा स्पर्धेच्या १७ वर्षांखालील मुलांच्या गटात अंशुमन गजानन कुळमेथे, ओम आशिष चुंबळे, जोएल बाबूजण प्रधान, प्रज्योत नीलकंठ उपरे आणि राधेश प्रवीण लांडे यांनी तृतीय क्रमांक मिळविला.
विद्यार्थ्यांच्या या यशामागे क्रीडा शिक्षक पुंडलिक वाघमारे, हर्षल क्षीरसागर आणि रोहित शर्मा यांचे मार्गदर्शन लाभले. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल संस्थेचे पदाधिकारी, मुख्याध्यापिका मंजुषा अलोने, मुख्याध्यापिका सिमरनकौर भंगू, मुख्याध्यापक रफिक अन्सारी तसेच शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सर्व यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन केले.

    You cannot copy content of this page