गावं ते शहर जोडणारा मुख्य दुवा लालपरी. – बादल बेले

HomeNewsनागपुर डिवीजन

गावं ते शहर जोडणारा मुख्य दुवा लालपरी. – बादल बेले

– राजुरा आगारातर्फे बस स्थानकात राज्य परिवहन महामंडळाचा ७७ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा.
– प्रवाशांचे गुलाब पुष्प व पेढे देऊन केले स्वागत. चालक वाहकाच्या हस्ते केक कटिंग.

गौतम नगरी चौफेर  //राजुरा १ जुन – राज्य परिवहन (एसटी) महामंडळाच्या ७७ व्या वर्धापन दिनानिमित्त राजुरा आगारातर्फे बस स्थानकात मोठया उत्साहात प्रवाश्यांना गुलाब पुष्प व पेढे देऊन स्वागत करण्यात आले. तर चालक वाहकाच्या हस्ते केक कापून वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी राजुरा आगारात कार्यरत महिला कर्मचार्यांनी बस स्थानकात अतिशय सुंदर अश्या रांगोळ्या व राज्य परिवहन महामंडळाचा (एसटी) लोगो काढून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी राकेश बोधे, आगार व्यवसथापक हे होते. तर कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून बादल बेले, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष, नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था यांची उपस्थिती होती. प्रमूख अतिथी म्हणून राजुरा आगाराचे वाहतूक निरीक्षक इमरान शेख, बस स्थानक प्रमुख वाहतूक निरीक्षक शुभांगी लाडसे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरविंद ठमके यांनी केले. तर आभारप्रदर्शन मनोज कोल्हापुरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरीता कल्पना नारसिंह, शितल ढवस – बोपचे, वाहतूक नियंत्रक नागेकर व राजुरा आगारातील इतर कर्मचार्यांनी अथक परिश्रम घेतले. राजुरा ते पुसद बसमधील व अन्य प्रवाश्यांना गुलाब पुष्प व पेढे देऊन स्वागत करण्यात आले.

———————————————
बादल एन. बेले
महाराष्ट्र राज्य अध्यक्ष
नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था
          मानवी शरीरात जशी लाल रक्ताची आवश्यकता आहे तशीच संपूर्ण महाराष्ट्रात रस्त्यांवर धावणारी लालपरी एसटी बस आवश्यक असुन गावखेडे ते शहरी भाग यांना जोडणारा महत्वपूर्ण दुवा म्हणून राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस आहे. अतीशय अल्प दरात आणि सर्वांच्या हक्काची वाटणारी विशेषतः विध्यार्थी, महीला- पुरुष, ज्येष्ठ नागरिक आनंदाने याचा लाभ घेतात. बदलत्या काळात एसटी बसने सुद्धा आमूलाग्र बदल करून सुधारणा केल्या आहेत. पर्यावरणाचा विचार करून नवीन ई बस सेवेत दाखल झाल्या आहेत. कर्मचाऱ्यांना सुद्धा पाहिजे तश्या सोयीसुविधा उपलब्ध करून ही एसटी बसची सेवा उत्तरोत्तर वाढतच जावी अशी सदीच्छा बादल बेले यांनी यावेळी व्यक्त केली.
———————————————

COMMENTS

You cannot copy content of this page