निरीक्षकांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थी सुरक्षा समितीची बैठक संपन्न
गौतम नगरी चौफेर (विशेष प्रतिनिधी बिबी): सध्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांचा सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला असून प्रसशासनाने याविषयीं कडक कायदे हातात घेतले आहेत. शाळेमध्ये विविध समित्या गठीत करण्यात येत आहे. यासाठी पोलीस प्रशासन ही शाळेचा सोबत काम करीत आहे. दरम्यान या अनुषंगाने दि. १८ ऑक्टोबर २०२४ ला सांगोडा येथील जि. प. उच्च.प्राथमिक शाळा,सांगोडा येथे विद्यार्थी सुरक्षा कार्यशाळा घेण्यात आली.
या बैठकीत शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत चर्चा करण्यात आली. या कार्यशाळेला उदघाटन म्हणून कोरपनाचे पोलीस निरीक्षक दारासिंग राजपूत उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजेंद्र कांबळे, प्रमुख अतिथी पोलीस अधिकारी जाधव, मुख्याध्यापिका शोभा शेंडे, सांगोडाच्या पोलीस पाटील सुचिता पाचभाई, प्रा. आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी संकेत शेंडे, डॉ.अनघा पाटील, डॉ.आकांक्षा महाजन, मनीषा लांडे, शीतल बावणे, प्रमोद मोहितकर, पुष्पा वरपटकर उपस्थित होते.
बैठकीत शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी विविध उपाययोजनांबद्दल चर्चा करण्यात आली. शाळेच्या परिसरात सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करणे, सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे, विद्यार्थ्यांना स्वयंरक्षणाचे प्रशिक्षण देणे आणि शाळेच्या परिसरात वाहनांच्या वेगवान गाडी चालवण्यावर बंदी घालणे यासारख्या मुद्द्यांवर चर्चा झाली. पोलिस निरीक्षकांनी शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत काही महत्त्वाचे सूचना दिल्या. त्यांनी शाळेतील प्रशासनाला विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी काही काटेकोर पावले उचलण्याचे आवाहन केले. तथा पोलीस विभाग आपल्या परीने विद्यार्थ्यांचा सुरक्षिततेसाठी सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. या बैठकीत शाळेतील शिक्षकांनी आणि पालकांनी ही सहभाग घेतला आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत त्यांनी आपले महत्त्वाचे सूचना दिल्या.
विद्यार्थ्यांचा आरोग्यविषयी आरोग्य विभागाचा वतीने वैद्यकीय अधिकारी डॉ. संकेत शेंडे यांनी आरोग्याची काळजी कशी घ्यावी याविषयीं मार्गदर्शन केले. या बैठकीमुळे शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत जागरूकता वाढेल आणि शाळेतील प्रशासनाला विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी काही काटेकोर पावले उचलण्यास प्रोत्साहन मिळेल. कार्यक्रमात मुलीची सुरक्षितता, गुड टच, बॅड टच, पोस्को कायदा,आदी विषयावर सर्वांचे उद्बोधन करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन शिक्षक राजेश धांडे, यांनी केले तर आभार प्रदर्शन रमेश टेकाम यांनी केले. कार्यक्रमाला पालक व विद्यार्थी मोठ्याप्रमाणावर उपस्थित होते. हे विशेष
COMMENTS