कुमारी कादंबरी नक्षीने हिने दहावीच्या परीक्षेत 97.20 टक्के गुण मिळवून तालुक्यात प्रथम 

HomeNewsनागपुर डिवीजन

कुमारी कादंबरी नक्षीने हिने दहावीच्या परीक्षेत 97.20 टक्के गुण मिळवून तालुक्यात प्रथम 

कादंबरी हिचा शाल, ट्राफी व पुष्पगुछा देऊन सन्मानीत करण्यात आले.

गौतम नगरी चौफेर // भद्रावती तालुका प्रतिनिधी राजेश येसेकर भद्रावती :  दिनांक 10 जून 2025, मंगळवार, हा दिवस बल्लारपूर तालुक्याच्या इतिहासात प्रेरणादायी ठरणारा ठरला! नाभिक समाजातील तेजस्वी कन्या कुमारी कादंबरी प्रवीण नक्षीने हिने इयत्ता दहावीच्या परीक्षेत प्रत्यक्षा 97.20% गुण मिळवत तालुक्यात प्रथम क्रमांक व जिल्ह्यात द्वितीय क्रमांक मिळवण्याचा गौरव प्राप्त केला!
तिचे प्राथमिक शिक्षण दिलासा ग्राम, बल्लारपूर येथे झाले असून, अत्यंत साध्या परिस्थितीत मोठं स्वप्न पाहत तिने हे यश संपादन केलं आहे. तिच्या या अफाट मेहनतीला आणि जिद्दीला जय जिवाजी क्रांती सेना – महाराष्ट्र राज्य, बल्लारपूरच्या वतीने आज सन्मानित करण्यात आले. या विशेष प्रसंगी शाल, स्लीप, ट्रॉफी व गुलदस्ता देऊन कादंबरीचा गौरव करण्यात आला. हा सन्मान आदरणीय पोलीस उपनिरीक्षक श्री. भास्करराव कुंदावर सर आणि सहसल्लागार मा. श्री. शंकरराव दर्वे काकाजी यांच्या हस्ते करण्यात आला.
उपस्थित अध्यक्ष जय जिवाजी क्रांती सेना अध्यक्ष मा. श्री. गणेश भाऊ वनकर आणि उपाध्यक्ष श्री. सुरज भाऊ नागतुरे हे स्वतः उपस्थित होते

COMMENTS

You cannot copy content of this page