गौतम नगरी चौफेर संजीव भांबोरे भंडारा : डॉ. भदन्त आनंद कौशल्यायन जयंतीनिमित्त शनिवार, ३१ जानेवारीला बोधिचेतिय संस्थान, खुटसावरी मार्ग, राजेगांव (एमआयडीसी) येथील डॉ. भदन्त आनंद कौशल्यायन परिसरात डॉ. भदन्त धम्मदीप महाथेरो यांचा पुञ्जानुमोदन, गुणानुस्मरण व धम्मदेशना सह विविध कार्यक्रम उत्साहात पार पडले.
यावेळी भदन्त बोधीरत्न, मेत्तानंद, सुगत, शिलभद्र, नागसेन, विनयबोधी, धम्मज्योती, रत्नसार, थूलनंदा, संघमित्रा, आम्रपाली, प्रज्ञागौतमी, रतनबोधी, शील, रतनसार आदी भिक्खू-भिक्खूणी उपस्थित होते. सकाळी संघत्दक्खिणापूजा, अस्थिकलश परिक्रमा व पालि सुत्त पठण झाले. नंतर डॉ. भदन्त धम्मदीप महाथेरो यांच्या बुद्धधम्म प्रचारातील योगदानावर धम्मदेशना झाली. भदन्त बोधीरत्न, शिलभद्र, धम्मज्योती यांनी तथागत गौतम बुद्ध व महाथेरो यांच्या कार्यावर मार्गदर्शन केले. भिक्खु संघाला भोजनदानानंतर उपासक-उपासिकांना भोजन दिले.
दुपारी ४ वाजता तनुजा नागदेवे यांच्या संचालनात समाजप्रबोधन कार्यक्रम सादर झाला. शुभारंभप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य अस्मिता डोंगरे, पोलिस निरीक्षक सुभाष बारसे, सरपंच ज्योती नंदेश्वर, प्रदीप वासनिक, साहित्यिक अमृत बन्सोड, सुरेंद्र बन्सोड, अचल मेश्राम, कुंजन शेंडे, युवराज रामटेके, वनविभागाचे सोमकुवर उपस्थित होते. रात्री कव्वाल सुरज आतिष यांचा बहारदार समाजप्रबोधन कार्यक्रम झाला. त्याचा शुभारंभ रोशन जांभुळकर, ज्ञानचंद जांभुळकर, प्रदीप वासनिक, अचल मेश्राम यांनी केला.

आयोजित सोहळ्यादरम्यान धारगाव आरोग्य केंद्राच्या वतीने आरोग्य शिबिर भरले. यात उपासक-उपासिकांनी बीपी व शुगर तपासणी केली. जवळपास ६३ जणांनी लाभ घेतला. डॉ. सविता मालडोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य सेविका दीक्षा शेंडे, आशा वर्कर सुजाता साखरे व आरोग्य चमूने सहकार्य केले. सिकलसेलवर जनजागृतीही झाली. कार्यक्रम यशस्वी करण्याकरता धर्मेद्र बडोले, राजकुमार वाहने, अमरदीप बोरकर, संघदीप भोयर, महेंद्र तिरपुडे, विजय खोब्रागडे, विनोद बोरकर, नरेश साखरे, सुरेंद्र बन्सोड, धनंजय रामटेके, कुंजन शेंडे, नंदकुमार साखरे, डॉ. इलमकर, अनमोल कांबळे, सुधीर सुखदेवे, सज्जन रामटेके, शिवराम शेंडे, दिलीप बडोले, अंकित वासनिक, प्रदीप वासनिक, कल्पना रामटेके, अंतकला सुखदेवे, ज्ञानपाल बडोले, राजकपूर बांबोर्डे, नितेश टेंभुर्णे, रितेश रामटेके, भूपेंद्र रामटेके, मनोज वासनिक यांच्यासह माडगी, टेकेपार, खुटसावरी, राजेगांव, वाघबोडी, खुर्शिपार, गुंथारा व परीसरातील उपासक-उपासिकांनी सहकार्य केले. त्याचप्रमाणे जिल्हा परिषद सदस्य स्मिता गंगाधर डोंगरे यांच्या तर्फे समाज प्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.


COMMENTS