– विद्यार्थांची बैलगाडी, भजन मंडळ व दुचाकी- चारचाकी वरून रॅली.
– पाचगाव येथे आमदार तरं पंचाळा येथे तहसीलदार यांची विशेष उपस्थिती .
गौतम नगरी चौफेर (बादल बेले राजुरा २७ जुन) – राजुरा तालुक्यातील सर्व शाळांमध्ये शाळा सत्रारंभ शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाअंतर्गत इयत्ता 1 ली मध्ये दाखल झालेल्या विद्यार्थ्यांची बैलगाडी, भजन मंडळ, दुचाकी तसेच कार अशा विविध मार्गांनी बँड पथका द्वारा प्रभात फेरी काढण्यात आली. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या पावलांचे ठसे, एक पेड मा के नाम अंतर्गत वृक्षारोपण व त्या वृक्षाचे संवर्धन करण्यासाठी शपथ देण्यात आली. मोफत पाठ्यपुस्तक, गणवेश वाटप, बुट व मोजे वितरण करण्यात आले. राजुरा विधानसभा निर्वाचन क्षेत्राचे आमदार देवराव भोंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, पाचगाव येथे हर्षोल्लासात प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. आपल्या उद्घाटनीय भाषणात आमदार गावांतील ग्रामस्थ व शिक्षकांनी सहकार्याने काम केल्यास जिल्हा परिषद शाळेचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही अशी आशा व्यक्त केली.
तालुक्यातील प्रत्येक जिल्हा परिषदेच्या शाळेत पदाधिकारी, अधिकारी, गट साधन केंद्रातील कर्मचारी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, सदस्य यांच्या उपस्थितीत पार पडला. सदर शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमासाठी शिक्षण विभाग जिल्हा परिषद चंद्रपूर येथील अधिकारी श्रीकांत बोबडे, गटविकास अधिकारी प.स.राजुरा, मंगला तोडे गटशिक्षणाधिकारी प.स.राजुरा, सावनकुमार चालखुरे, विस्तार अधिकारी शिक्षण, विशाल शिंपी शिक्षण विस्तार अधिकारी शिक्षण, सर्व केंद्र प्रमुख, ज्योती गुरनुले विषय सा.व्य.शाळा प्रवेशोत्सव समन्वयक, तसेच गट साधन केंद्रातील कर्मचारी यांच्या सहकार्याने अतिशय उत्साहाने पार पडला.



COMMENTS