गौतम नगरी चौफेर (बादल बेले राजुरा:) – ॲड. यादवराव धोटे कनिष्ठ महाविद्यालयात दिनांक 26 जून 2025 रोजी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती व “अमली पदार्थ सेवन विरोधी दिन” उत्साहात साजरे करण्यात आले.
सकाळी सर्वप्रथम छत्रपती शाहू महाराज जयंतीचा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या वर्षा पी. पोडे उपस्थित होत्या. यावेळी विद्यार्थ्यांना शाहू महाराजांच्या सामाजिक न्याय, समता व शिक्षण क्षेत्रातील योगदानाची माहिती देण्यात आली.
यानंतर “जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन” या उपक्रमाअंतर्गत विशेष कार्यक्रम घेण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून ए.पी.आय. हेमंत पवार व संघपाल गेडाम (पोलीस स्टेशन, राजुरा) उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना अमली पदार्थांचे दुष्परिणाम, त्याचा तरुणाईवर होणारा परिणाम याविषयी सखोल माहिती दिली. यानंतर विद्यार्थ्यांनी अमली पदार्थांपासून दूर राहण्याची शपथ घेतली.यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या वर्षा पोडे, पर्यवेक्षक प्रा. इर्शाद शेख, सर्व विभाग प्रमुख,प्राध्यापक व कर्मचारी वृंद तसेच विद्यार्थी वृंद उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्या वर्षा पोडे संचालन प्रा. धनंजय डवरे व आभार प्रा.आसावरी जिवतोडे यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीतांनी झाली.

COMMENTS