शेतकऱ्यांच्या शेतमाल हमीभावासाठी विधानसभेत तोंड न उघडणाऱ्या आमदारांना घेराव घाला आंदोलनाअंतर्गत शेतकरी संपर्क यात्रा यशस्वी
गौतम नगरी चौफेर (संजीव भांबोरे भंडारा (जिल्हा प्रतिनिधी) – राष्ट्रीय किसान मोर्चा,जिल्हा भंडारा च्या वतीने महाराष्ट्र राज्य आणि जिल्ह्यातील सर्व ‘शेतकरी बंधू- भगिनी ‘यांची परिषद सोमवार , दिनांक 5 मे 2025, सकाळी 11 ते 4 पर्यंत बावणे कुणबी समाज सभागृह लाखनी या ठिकाणी भव्य शेतकरी संपर्क परिषद पार पडली ,सदर परिषदेत सन 2024 – 25 मधील खरीप आणि रब्बी हंगामातील विमा सर्व शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी किमान 50 हजार रुपये,विमा कंपनीकडून तातडीने 7 दिवसाच्या आत मिळाला पाहिजे. तसेच ज्या विमा कंपनीच्या प्रतिनिधीने दुजाभाव केलेला आहे, त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे. विमा कंपन्या ह्या शेतकऱ्यांना नुकसान झाल्यानंतर विमा देण्यासाठी आहेत, प्रतक्ष्यात मागील आठ वर्षात विमा कंपन्यांनी हजारो कोटीचा नफा कमवलेला आहे. मागील 8 वर्षात, विमा हप्ता हिश्या पैकी शेतकरी, राज्य सरकार व केंद्र सरकार यांचे हजारो कोटी विमा कंपन्याकडे शिल्लक आहेत. नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वानुसार, ढगफुटी,अतिवृष्टी दुष्काळ , रोगराई ,यासारख्या परिस्थितीत शेतकऱ्यांचे सरसकट नुकसान झालेले असते. तेव्हा महाराष्ट्र राज्या सकट भंडारा जिल्ह्यातील सर्व शेतकरी बंधू व भगिनी यांनी ” ज्यांना काहीही विमा आलेला नाही “किंवा “ज्यांना तुटपुंजा विमा आलेला आहे ” अशा सर्वांनी आपले आधार कार्ड व विमा भरलेली पावती सोबत घेऊन सदर परिषदेत उपस्थित राहावे. बैठकीमध्ये चालू वर्षाचा सरसकट हेक्टरी पन्नास हजार रुपये तसेच मागील आठ वर्षापासून विमा कंपनीकडून येणे असलेली रक्कम, याबाबतीत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. आपल्या हक्काची विमा रक्कम मिळण्यासाठी तसेच शेतकर्यांना रास्त हमीभाव न देणे,पिकविमा कंपन्यांना हजारो कोटीचा फायदा मिळवून देणे, शेतीला २४ तास व मोफत वीज न देणे व शेती वीजिबलाचा हजारो कोटींचा घोटाळा करणे , कर्ज मुक्त शेतकरी , सौर ऊर्जा ची अप्रत्यक्ष पणे जबरदस्ती करणे, कर्जमाफी इत्यादी प्रमुख प्रश्नांवर विधानसभेत तोंड न उघडणार्या
आमदाराना घेराव घालो आंदोलन करणे याविषयी
बैठकीत सर्वानुमते आंदोलनाची घोषणा करण्यात आली, कार्यक्रमाचे उद्घाटक मा. शेषरावजी निखाडे , प्रगतिशील शेतकरी , सेलोटी , तर अध्यक्षता मा .दीपक इंगळे , प्रदेशाध्यक्ष , राष्ट्रीय किसान मोर्चा यांनी केले. सदरील बैठकीत जगाचा अन्नदाता शेतकरी बंधू-भगिनी हे मोठ्या संख्येने उपस्थित होते, कार्यक्रमाचे प्रास्तविक मा.रविदास लोखंडे (,जिल्हा अध्यक्ष , भारत मुक्ती मोर्चा ,) विजयकांत बडगे , (प्रभारी ,शेड्युल कास्ट फेडरेशन ,भंडारा) , तर सूत्र संचालन अभय डी रंगारी ,(प्रभारी ,राष्ट्रीय किसान मोर्चा) यांनी केले.

COMMENTS