नगरपरिषदेतर्फे साडेतीन हजार दंड वसूल , पोलिसांच्या चोख बंदोबस्त व्हीआयपी, साकोली मिडीया व फ्रिडमचे आयोजन •
गौतम नगरी चौफेर (संजीव भांबोरे भंडारा) – आठवडी बाजार साकोली येथे येणाऱ्या काही बेजबाबदार दूकानदारांनी येथील सौंदर्य स्थळावर घाण करून पळून गेले. त्याचे सोशल मिडीयातून संतप्त पडसाद उमटले. त्यातच सीओ मंगेश वासेकर यांनी याची तातडीने दखल घेत त्या वाहनचालकाचा शोध घेऊन दंडात्मक कारवाई केली. पण वारंवार हा गलिच्छ प्रकार होवू नये यासाठी रविवार दिवशी आठवडी बाजारात ( २९ जून ) ला “स्वच्छता जनजागृती” रॅली आयोजकांनी काढून सर्व दूकानदारांना आवाहन केले. यावेळी पोलीस निरीक्षक एम. पी. आचरेकर यांच्या मार्गदर्शनात रॅलीत पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
या रॅलीचे आयोजन व्हीआयपी ग्रुपचे अध्यक्ष अनिल कापगते, साकोली मिडीयाचे आशिष चेडगे, फ्रिडमचे किशोर बावणे, सामाजिक कार्यकर्ता महेश पोगळे, निसर्गप्रेमी पत्रकार रवि भोंगाणे यांनी केले होते याला शेकडो जनतेने रस्त्यावर समर्थन करीत हा अगदी आवश्यक विषय असल्याची जनतेने प्रतिक्रिया दिली. यादरम्यान माईकवर आठवडी बाजारात सांगितले की, दूकानदारांनी सायंकाळी घरी जातांना सडका भाजीपाला सौंदर्य स्थळावर फेकू नये. तसे पुन्हा केल्यास गुन्हा दाखल केला जाईल. रविवारी बाजारातील टाकाऊ भाजीपाला तेथेच एका पोत्यात भरून ठेवा. इतरत्र रोडभर फेकल्यास त्याची फोटो काढून नगरपरिषद तर्फे दंडात्मक कारवाईची तातडीने मागणी केली जाईल. सर्व्हिस रोडवर ठोकणा-या सळाखी रोडच्या मध्यभागी येतात याने दूचाकीस्वाराच्या डोक्याला दुखापती झाल्या. त्या सळाखी सरळ रेषेत ठेवावे. अन्यथा अपघातास कारणीभूत म्हणून पोलीसांत गुन्हा दाखल केला जाईल. असे संभाषण करण्यात आले. ही रॅली एकोडी रोड चौक ते नगरपरिषद चौक पर्यंत काढण्यात आली. तलाव सौंदर्य स्थळांवर स्वच्छता ठेवणे आवश्यक आहे या “साकोली स्मार्ट ग्रीन” मोहिमेवर येथील कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी मंगेश वासेकर यांनी सुद्धा या अभिनव उपक्रमाला समर्थन करीत शनिवार २८ जूनला घाण करणा-या वाहनचालकास १,५०० रूपये आणि मागे थर्माकोलचा भरपूर कचरा याच सौंदर्य स्थळावर फेकणा-या एका इलेक्ट्रॉनिक दूकान मालकावर २ हजारांची स्वच्छता अभियंता संतोष दोंतूलवार यांच्या मार्फत दंडात्मक कारवाई केली आहे. व सर्व जनतेने या “एक्शन कारवाई” चे स्वागत करून अभिनंदन केले आहे.
रविवारी निघालेल्या या रॅलीला आयोजक अनिल कापगते, आशिष चेडगे, किशोर बावणे, महेश पोगळे, रवि भोंगाणे यांसह पत्रकार मनिषा काशिवार, अंकीत कापगते, सिताराम मौजे, चंद्रशेखर कापगते, नोमित कापगते, भरत गहाणे, दिलीप निनावे, महिला सामाजिक कार्यकर्त्या मनिषा पोगळे, तनुजा नागदेवे यांसह शंभरावर महिला पुरुष जनता सहभागी झाली होती. यादरम्यान पोलीस नायक दिपक राऊत, सचिन कापगते, गुन्हे नोंद विभागाचे चंदू थेर यांचा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

COMMENTS