भोयगाव – धानोरा मार्गावरील वर्धा नदीच्या पुलावरून पाणी, मार्ग बंद

HomeNewsनागपुर डिवीजन

भोयगाव – धानोरा मार्गावरील वर्धा नदीच्या पुलावरून पाणी, मार्ग बंद

गौतम नगरी चौफेर (विशेष प्रतिनिधी नांदाफाटा) – भोयगाव – धानोरा मार्गावरील वर्धा नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे हा मार्ग बंद करण्यात आला आहे. काल मुसळधार पाऊस जिल्हासह विदर्भात पळल्याने नाले भर ..भरून गेल्याने (वर्धा ) नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने पुलावरून पाणी वाहू लागले आहे, त्यामुळे  या मार्गावरून प्रवास करणे अत्यंत धोकादायक झाला आहे.

परिणामी, चंद्रपूर, घुगुस, गडचांदूर आणि कोरपना शहरांना जाण्यासाठी नागरिकांना राजुरा किंवा इतर पर्यायी मार्गांचा वापर करावा लागत आहे. दरम्यान प्रशासनाकडून नागरिकांना या मार्गावरून प्रवास न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

नदीच्या पाण्याची पातळी अधिक अधिक वाढत असल्याने प्रवाशांनी सतर्कता बाळगावी आणि प्रशासनाच्या सूचना पाळाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.

COMMENTS