मंत्रीपदी विराजमान असतांना आमदार मुनगंटीवारांनी बांबू कारागिरांकडे लक्ष दिले असते तर बांबू कारागिरांवर ऊपासमारीची वेळ आली नसती 

HomeNewsनागपुर डिवीजन

मंत्रीपदी विराजमान असतांना आमदार मुनगंटीवारांनी बांबू कारागिरांकडे लक्ष दिले असते तर बांबू कारागिरांवर ऊपासमारीची वेळ आली नसती 

(संतोष पटकोटवार यांनी व्यक्त केली खंत)


गौतम नगरी चौफेर (संतोष पटकोटवार गडचांदूर) – केंद्रात आणी राज्यात जवळ जवळ अकरा वर्षापासून भारतीय जनता पार्टीचे सरकार आहें. ;भारतीय जनता पार्टीचा एकच नारा शेतक-यांचा सातबारा- कोरा -कोरा -कोरा; अच्छे दिन आयेंगे; सबका साथ सबका विकास, सबका साथ सबका विकासा मध्ये ईतर समाजातील लोकांचा विकास झाला की नाही माहीत नाही परंतु बूरूड समाजातील बांबू कारागिर पिछाडीवर राहीला आहे, चंद्रपुर आणी बलारपूर विधानसभा क्षेत्रा मध्ये सुधीर मुनगंटीवारांचे पारडे जड राहीले आहे, ते तीस पसतीस वर्षापासून सतत आमदार मह्णुन निवडुन येत असून चंद्रपुर जिल्ह्याचे लोकप्रतीनिधीत्व करीत आहे, चंद्रपुर जिल्ह्याला पहील्यांदा भाऊंच्या रूपात वन मंत्री पद मिळाल्याने चंद्रपुर जिल्ह्यातील बांबू कारागिरांनी फटाके फोडून मोठा जल्लोष साजरा केला होता, भाऊंना बांबू कारागिरांना बद्दल दांडगा अभ्यास आहे, कारण बांबू कारागिरांची साथ भाऊंना नेहमीच मिळाली, भाऊ दोनदा महाराष्ट्राच्या राज्याचा मंत्री पदाचा उपभोग घेतला आहे, चंद्रपुर जिल्ह्याच्या काना कोप-यात बांबू पासून विविध प्रकारच्या वस्तू तयार करून आपल्या कूटूंबाचा गाड़ा चालविण्याचा काम बांबू कारागिर करतात सूधीर भाऊंच्या मतदार संघात जास्तीत जास्त बांबू कारागिर आहेत, आणी संपूर्ण बांबू कारागिर मुनगंटीवारांना मानणारा वर्ग आहें, सर्व बांबू कामगार निवडणुक आली की भाऊंना मोठ्या आनंदाने मतदान करतात भाऊकडून बांबू कारागिरांना मोठी अपेक्षा होती की भाऊ आपल्यासाठी काहीतरी करतींल ज्यामुळे आपल्या परीस्थीतीची काहीतरी कायापालट होईल या अपेक्षेने चंद्रपुर व बलारपूर मतदार संघातील जसे कोठारी तोहोगाव, जूनोना, वायगाव, बोर्डा, चिचपल्ली, नि़बाळा, व स्थानिक चंद्रपुर येथील सूद्धा बूरूड समाजातील व ईतर समाजातील बांबू कारागिर भाऊंच्या पाठीशी नेहमी ऊभा राहीला आहे, मागील पंचविस वर्षाचा कार्यकाल जाऊद्या परन्तु मागील अकरा वर्षापासून भाऊ सत्तेत आहेंत आणी भाऊकडे सर्वात मोठे पद म्हणजे महाराष्ट्राचे अर्थ, वने तथा चंद्रपुर जिल्ह्याचे पालकमंत्री पद होते, बूरूड समाजाचा कायापालट करण्या साठी भाऊकडे खूपकाही होते भाऊंनी थोडा जरी आपल्या मतदार संघातील व चंद्रपुर जिल्ह्यातील बांबू कारागिरांचा विचार केला असता तर आज बूरूड समाज आणी बांबू वर अवलंबून असलेला ईतर समाजाची एवढी बिकट परीस्थीती पहायला मिळाली नसती गेल्यां एक दिड वर्षा पासून चंद्रपुर जिल्ह्यात बांबूला रोग आल्याने संपूर्ण वनातील बांबू वाळुन गेला आहे, शासनाकडुन सवलती दरात पूरवठा होणारा हीरवा बांबू वनविभागाने पुर्णता बंद केला आहें, वारंवार बांबुची मागणी बुरुड समाजाने केली आहे परंतु अपयश हाती आले, बांबू पूरवठा वनविभागाने पुर्णता बंद केला आहे, चंद्रपुर जिल्ह्यात सत्तेतील पाच आमदार असतांना बांबू पासुन वंचित राहुन बूरूड कारागिरांना दारिद्रयाचे जिवन जगावे लागत आहें, ही अत्यंत दूखाची बाब आहे, बूरूड कारागिरांना बांबू साठी वनवन भटकावे लागत आहे, अशा परीस्थीत काही लोकांना गढ़चिरोली जिल्ह्यातील आणी काही लोकांना परराज्यातून आसाम वरून महागळा बांबू विकत आनावा लागत आहे व आपला ऊदरनिरवाह करावा लागत आहे, या परीस्थीती मध्ये आपले कर्तव्य काय आहे??हे आमदाराना सांगण्याची गरज आहें काय ?? काय उपाय योजना केली पाहीजे हे कोणी सांगण्याची गरज आहे काय??काही लोकांना राहण्यासाठी पक्के मकान नाही, परिस्थिति बेताची असल्याने मुलांना चांगले शिक्षण देऊ शकत नाही,चांगल्या पद्धतीने मुलांचे लग्न करू शकत नाही काही लोकांकडे तर बापाची मयत करायला सूद्धा पैसे नसतात अशा एक ना अनेक अडचणीत बांबू कारागिर सापडलेला आहें, मूनगंटीवारांनी मंत्रीपदी  विराजमान असताना बांबू कारागिरांसाठी थोड़े फार प्रयत्न केले असते तर हा समाज प्रगतीपासून कोसो दूर राहीला नसता, बांबू कारागिरांना शासनाचा आधार मिळाला असता तर बूरूड कारागिरांना समाजात एक चांगले व्यक्तिमत्व म्हणून स्थान मिळाले असते, बांबू कारागिरांच्या भरोषावर निवडून आलेल्या आमदार खासदारांचे पाच वर्षात कायापालट होते मात्र सामान्य मानसाला आमदार खासदार बनविणा-या बांबू कारागिरांना दिवस रात्र  जिवाचे रान करणा-या  बूरूड समाजातील बांबू कारागिरांची कायापलट होत नाही,याला जबाबदार कोन???? सत्तेच्या अकरा वर्षा मध्ये सूधीर भाऊनी निवड आश्वासनाच लालीपाप  देऊनच बांबू कारागिरांना समजाविण्याचा प्रयत्न केला काय ?? असा प्रश्न नागरीकापुढे उपस्थित झाला आहे, जर वन मंत्री पदावर विराजमान असतांना आमदार मुनगंटीवारांनी बूरूड समाजातील बांबू कारागिरांकडे लक्ष दिले असते तर बांबू कारागिरांवर ऊपासमारीची वेळ आली नसती अशी ख़ंत शेतकरी संघटनेचे सरचिटणीस तथा चंद्रपुर जिला बूरूड समाजाचे संघटन सचिव संतोष पटकोटवार यानी व्यक्त केली.

COMMENTS

You cannot copy content of this page