वंदना विनोद बरडे अधीसेवीका ऊप जिल्हा रूग्णालय वरोरा जिल्हा चंद्रपूर साजरी
गौतम नगरी चौफेर (वरोरा) – दिनांक १५ आगस्ट २०२५ ला स्वातंत्र्य दिनाच्या उत्साहाचे आयोजन करण्यात आले होते. १३,१४,१५ आगस्ट ला स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने हर घर तिरंगा अभियान राबविण्यात आले. त्यात ऊप जिल्हा रूग्णालय वरोरा येथे तिन्ही दिवस झेंडा फडकवीण्यात आला.व्रुक्षारोपण करण्यात आले. झेंडा गित सादर करण्यात आले. दिंनांक १५ आगस्टला अवयव दानाची शपथ वंदना विनोद बरडे सहायक अधीसेवीका, तंबाखू शपथ अमोल भोग व संविधानाची शपथ बंडू पेटकर यांनी दिली. हा कार्यक्रम डॉ प्रफुल्ल खूजे वैद्यकीय अधिक्षक यांच्या अध्यक्षतेखाली खाली व मार्गदर्शनाखाली वंदना विनोद बरडे सहायक अधीसेवीका यांनी आयोजित केला होता. या कार्यक्रमाला रुग्णालयाचे सर्व डॉक्टर्स, परिसेवीका, अधिपरिचारीका, टेक्शीशियन, पाॅरामेडीकल स्टाफ, कक्षसेवक सफाई कामगार हजर होते.






COMMENTS