गौतम नगरी चौफेर राहुल हंडोरे रायगड दि. 2 : डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या खुल्या पत्रावर आधारित रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचा 69 वा वर्धापन दिन सोहळा क्रांतिभूमी महाड येथे भव्य प्रमाणात साजरा होणार आहे.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) – पक्षाच्या वतीने महाड क्रांतिभूमी, चांदे मैदान, महाड, जिल्हा रायगड येथे दि. 3 नोव्हेंबर रोजी दुपारी 3.00 वाजता रिपब्लिकन पक्षाचा 69 वा वर्धापन दिन सोहळा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांच्या अध्यक्षते खाली आयोजित करण्यात आला असून केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री ना. रामदास आठवले हे वर्धापन दिन सोहळ्याचे उदघाटन कारणार आहेत.
महाड येथे होणाऱ्या रिपब्लिकन पक्षाच्या वर्धापन दिनाला रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीं, महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे, रोजगार हमी मंत्री भारतशेठ गोगावले, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ, रायगडचे खासदार सुनील तटकरे,आमदार महेंद्र दळवी आदिना निमंत्रित करण्यात आले आहे. वर्धापन दिन सोहळ्याचे स्वागताध्यक्ष आर पी आय रायगड जिल्हा अध्यक्ष नरेंद्र गायकवाड भूषविणार असून महाराष्ट्र राज्य सरचिटणीस गौतम सोनवणे हे सूत्रसंचालन करणार आहेत.
रिपब्लिकन पक्षाच्या वर्धापन दिनाला जिल्हा शाखा, ग्राम शाखा, महिला आधाडी, युवा आधाडी कार्यकर्त्यांनी हजारोच्या संख्याने उपस्थित रहावे असे आवाहन केंद्रीय उपाध्यक्ष सुरेश सावंत, केंद्रीय सचिव दयाल बहादुरे, राज्य सह सचिव राहुल हंडोरे, कर्जत तालुका अध्यक्ष हिरामण गायकवाड, कोकण प्रदेश संघटक मारुती गायकवाड, कर्जत तालुका महिला अध्यक्षा अलका सोनावणे आदिनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.




COMMENTS