राजुरा येथे ४३ वे राज्यस्तरीय मराठी विषय शिक्षकांचे दोन दिवशीय वार्षिक कृतिसत्राचे आयोजन.

HomeNewsनागपुर डिवीजन

राजुरा येथे ४३ वे राज्यस्तरीय मराठी विषय शिक्षकांचे दोन दिवशीय वार्षिक कृतिसत्राचे आयोजन.

-गौतम नगरी चौफेर (सौ सुवर्णा बादल बेले) – राजुरा येथील १७ व १८ जानेवारी ला राज्यातील शिक्षक करणार मराठी भाषेवर विचारमंथन.
– महाराष्ट्र मराठी माध्यमिक शिक्षक संघाचे आयोजन; शिक्षकांनी मोठ्यासंखेने उपस्थित राहण्याचे केले आवाहन.
राजुरा १३ जानेवारी
      महाराष्ट्र मराठी माध्यमिक शिक्षक संघ महाराष्ट्र राज्य व महाराष्ट्र मराठी माध्यमिक शिक्षक संघ तालुका राजुरा यांच्या संयुक्त विद्यमानाने ४३ वे राज्यस्तरीय मराठी विषय शिक्षकांचे दोन दिवशीय वार्षिक कृतीसत्राचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक १७ व १८ जानेवारी २०२६ रोजी महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय राजुरा येथे हे कृतिसत्र होणार असून राज्यातील विविध जिल्ह्यातून मराठी भाषा विषय शिक्षकांची उपस्थिती राहील. यादरम्यान मराठी भाषा पंधरवाड्याचेही आयोजन करण्यात आले आहे. दिनांक १७ जानेवारी ला दुपारी २ वाजता उद्घाटन समारंभ असून उद्घाटक म्हणून अरुण धोटे , नगराध्यक्ष, न.प.राजुरा यांची उपस्थिती राहील. तर विशेष अतिथी म्हणून सुधाकर अडबाले, शिक्षक आमदार चंद्रपूर , स्वागताध्यक्ष म्हणून ॲड . जयंतराव साळवे, अध्यक्ष ग्रामीण सहकार शिक्षण प्रसारक मंडळ चंद्रपूर, कार्यक्रमाचे अध्यक्ष घनश्याम पटले, अध्यक्ष, म.म.मा. शि.सं., कृतीसत्राच्या अध्यक्षा रजनी शर्मा, सह संपादक आ.म.म. अध्यापक, प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र मराठी माध्यमिक शिक्षक संघाचे मार्गदर्शक विजयकुमार लांडगे, सातारा, कार्यवाह दुधराम राऊत, गोंदिया, कार्यकारी अध्यक्ष भरत गावडे, सिंधुदुर्ग , उपाध्यक्ष अनिल बोरनारे, मुंबई, डॉ. मंजुषा सावरकर, पुणे ,सहकार्यवाह रोहिदास पोटे. रायगड, मोहन शिरसाट , वाशिम, दिगंबर माने, यवतमाळ , अंतर्गत हिशोब तपासणीस पुरुषोत्तम गोंधळे, भंडारा , सदस्य पांडुरंग सुतार , सातारा, गोपाल मुनघाटे , गडचिरोली, अनंत साठे, रत्नागिरी , मंगेश गोरीवले, रत्नागिरी , निलेश सोनटक्के, नागपूर , योगेशकुमार राहांगडाले, संपादक, आ.म.म.अध्यापक, गोंदिया , सुभाष कवडे, सांगली , डॉ. किशोर कवठे , राजुरा, सुभाष कुडके, रायगड , शकुंतला बघेल, गोंदिया आदींची उपस्थिती राहील. तर दिनांक १८ जानेवारी ला दुपारी १२ वाजता समारोपीय कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून घनश्याम पटले, अध्यक्ष, म.म.मा.शि.सं. गोंदिया, प्रमुख अतिथी म्हणून डॉ. ओमप्रकाश गोंड, तहसीलदार, राजुरा, डॉ. भागवत रेजिवाड, गट विकास अधिकारी, पं.स. राजुरा, राजेश पातळे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक), अश्विनी केळकर,शिक्षणाधिकारी (प्राथमिक), मनोज गौरकार, उप शिक्षणाधिकारी (माध्यमिक), सुभाष ताजने, सचिव, ग्रा.स.शि.प्र.मं., मंगला तोडे, गट शिक्षणाधिकारी,पं.स. राजुरा आदींची प्रामुख्याने उपस्थिती राहील. दोन दिवस चालणाऱ्या राज्यस्तरीय मराठी विषय शिक्षकांच्या कृतीसत्राला राज्यातील व विशेषता विदर्भातील सर्व जिल्ह्यातील शिक्षकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन रजनी शर्मा, मार्गदर्शक, राजू डाहुले, अध्यक्ष, बादल बेले, कार्यवाह व संपूर्ण आयोजन समितीमार्फत करण्यात आले आहे.
———————————————
*विशेष आकर्षण*
*शोधनिबंध, सादरीकरण व चर्चा*
डॉ. मंजुषा सावरकर, पुणे यांचा विषय “AI तंत्रज्ञानाच्या विद्यार्थ्यांच्या मराठी भाषा विकासासाठी उपयुक्तता.”
———————————————
डॉ. धर्मा गावंडे , सावली यांचा विषय “आजचा माध्यमिक इयत्ता नववी व दहावीचा अभ्यासक्रम व समाज माध्यम”
———————————————
डॉ. किशोर कवठे, राजुरा यांचा विषय “इयत्ता नववी व दहावीच्या पाठ्यपुस्तकातील (मराठी भाषा प्रथम) संवेदनशील पाठाचे अध्ययन अधिक संवेदनशील बनवून शिकवता येते का?”
———————————————
तसेच शिक्षकांचे कवी संमेलन व शिक्षक, विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम हे विशेष आकर्षण ठरणार आहेत. सदर कृतीसत्रामध्ये नवीन शैक्षणिक धोरण ,अध्यापन पद्धती, कृती संशोधन, मूल्यमापन व मराठी विषयाच्या अध्यापनातील नव्या दिशा यावर तज्ञ मार्गदर्शन करणार असून याचा थेट लाभ मराठी विषय शिक्षकांबरोबरच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेला होणार आहे. या कृतीसत्र आयोजनाकरिता सेवानिवृत्त मुख्याध्यापकांचे विशेष सहकार्य लाभत आहे.

COMMENTS

You cannot copy content of this page