विवेकानंद महाविद्यालयात आज पालक सभेचे आयोजन

HomeNewsनागपुर डिवीजन

विवेकानंद महाविद्यालयात आज पालक सभेचे आयोजन

गौतम नगरी चौफेर राजेश येसेकर : भद्रावती (प्रतिनिधी) : स्थानिक विवेकानंद महाविद्यालयात पालक संघाच्यावतीने आज दिनांक 17/10/2024 रोज गुरुवारला सकाळी 10.30 वाजता पालक सभेचे आयोजन करण्यात आले आहे. महाविद्यालयातील महायोगी अरविंद सभागृहात होणाऱ्या या सभेत विवेकानंद (ज्ञानपीठ), कॉन्व्हेंट वरोरा चे उपाध्यक्ष जयंत टेमुर्डे, कोषाध्यक्ष अभिजीत बोथले,  कर्मवीर कनिष्ठ महाविद्यालय घोडपेठचे प्राचार्य नरेश साळवे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नामदेव उमाटे यांच्या अध्यक्षतेत होणाऱ्या या पालक सभेत वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन पालक संघातर्फे करण्यात आले आहे. या सभेत नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या विविध स्कॉलरशिप योजनांसह अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे.

COMMENTS