एकोडी येथे राजस्व अभियान समाधान शिबीर संपन

HomeNewsनागपुर डिवीजन

एकोडी येथे राजस्व अभियान समाधान शिबीर संपन

गौतम नगरी चौफेर // संजीव भांबोरे भंडारा – तहसील कार्यालय साकोली अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियान समाधान शिबिराचे आयोजन समाज मंदिर एकोडी येथे करण्यात आले होते.  त्यामध्ये जातीचे प्रमाणपत्र, नान क्रिमिलियर २, अधिवास प्रमाणपत्र ४, उत्पन्न सर्टिफिकेट २५,आधार कार्ड अपडेट १५, फार्मर आयडी १, संजय गांधी निराधार १, सातबारे १६० काढण्यात आले.  या प्रसंगी एकोडी ग्रामपंचायतचे सरपंच संजय खोब्रागडे, उपसरपंच रिगण राऊत, ग्रामपंचायत सदस्य भावेश कोटांगले, मंडळ अधिकारी अजय धांडे, तलाठी गंगाधर शिवणकर, शैलेश मेश्राम, ढवळे मॅडम, मनोज कोटांगले, कार्तिक मेश्राम आदी उपस्थित होते. शिबिर यशस्वी करण्यासाठी कोतवाल दिलीप शहारे, दिलीप मेश्राम, मच्छीन्द्र लोणारे,अरविंद हटवार यांनी सहकार्य केले.

COMMENTS

You cannot copy content of this page