गौतम नगरी चौफेर अशोककुमार उमरे गडचांदूर – अमरावती येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ राजेंद्र गवई साहेब यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार दिनांक २५/११/२०२५ ला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी संदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले. सदर बैठकीत होऊ घातलेल्या अमरावती महानगरपालिका आणि जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा आढावा घेण्यात आला.

या बैठकीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महाराष्ट्र प्रदेश चिटणीस अशोककुमार उमरे, चंद्रपूर जिल्हा युवा अध्यक्ष सुरजभाऊ उपरे, राजुरा विधानसभा क्षेत्र अध्यक्ष माजी प्राचार्य रमेश पाटील, कोरपना तालुका सरचिटणीस मुनेश्वर मेश्राम,कोरपना तालुका संघटक वारलूजी नळे सहभागी झाले होते. सदर बैठकीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ राजेंद्र गवई यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस अशोककुमार उमरे यांना रिपब्लिकन पार्टीशी संलग्नित समता सैनिक दलाची उभारणी करण्यासंदर्भात अधिकार बहाल करण्यात आले.



COMMENTS