ऊप जिल्हा रूग्णालय वरोरा येथे संविधान दिवस साजरा

HomeNewsनागपुर डिवीजन

ऊप जिल्हा रूग्णालय वरोरा येथे संविधान दिवस साजरा

गौतम नागरी चौफेर गौतम धोटे वरोरा – आज दिनांक २६ नोव्हेंबर ला भारतात सर्वत्र संविधान दिवस साजरा केला जातो.त्याचेच औचित्य साधून ऊप जिल्हा रूग्णालय वरोरा येथे दिनांक २६ नोव्हेंबर २०२५ ला वंदना विनोद बरडे सहायक अधीसेवीका उपजिल्हा रुग्णालय वरोरा जील्हा चंद्रपूर यांनी डॉ प्रफुल्ल खूजे वैद्यकीय अधिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केला. डाॅक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन डॉ .प्रतिक दारुडे वैद्यकीय अधिकारी व वंदना विनोद बरडे सहायक अधीसेवीका यांनी केले. सतिस येडे आरोग्य सहाय्यक यांनी भारतीय संविधान ऊद्देशिकेचे वाचन केले व सर्वांनी संविधानाची शपथ घेतली.या कार्यक्रमासाठी डॉ प्रतिक दारुडे, वंदना विनोद बरडे, संगिता नकले,तुलसी कुमरे, प्रदिप गायकवाड गितांजली ढोक, सतीश येडे, बंडु पेटकर, बकमारे, रिना कन्नाके, महेंद्र कांबळे, शिवानंदन पाटील, शुभम कुकळे, लक्ष्मीकांत ताले, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमासाठी वंदना विनोद बरडे, बंडू पेटकर लक्ष्मीकांत ताले व रिना कन्नाके यांनी मेहनत घेतली.

COMMENTS

You cannot copy content of this page