– आदर्श शाळेने पहिल्याच प्रयत्नात गाठला विभागस्तर.
गौतम नगरी चौफेर (विशेष प्रतिनिधी राजुरा) – 24 सप्टेंबर शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय चंद्रपूर द्वारा आयोजित जिल्हा स्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा 2024-2025 अंतर्गत चंद्रपूर जिल्हा क्रीडा संकुल येथे पार पडलेल्या विविध वजन व वयोगटातील शालेय कुस्ती स्पर्धेत बालविद्या शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर चा इयत्ता सातवी तील विध्यार्थी अमोघ मंगेश पहाणपट्टे, आदर्श हायस्कुल येथील इयत्ता आठवीतील विध्यार्थी मानव अनिल मोहितकर यांची विभागस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धे करिता निवड झाली आहे.
चौदा व सतरा वर्ष वयोगटातील मुलांच्या शालेय कुस्ती खेळाकरिता एस. टी. विरुटकर, तालुका संयोजक, आदर्श शाळेचे प्रशिक्षक प्रकाश आमणर, हर्षल पेटकर, असुरखाना व्यायाम शाळा सास्ती यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच क्रीडा प्रशिक्षक भास्कर फरकाडे, हर्षल क्षीरसागर यांचे सहकार्य लाभले. अमोघ व मानव यांच्या यशाबद्दल माजी आमदार तथा बालविद्या शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक ऍड. संजय धोटे, संस्थेचे अध्यक्ष सतीश धोटे, उपाध्यक्ष मनोहरराव साबनानी, सचिव भास्करराव येसेकर, कोषध्यक्ष प्रकाश बेजंकीवार, आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर शाळेच्या मुख्याध्यापिका नलिनी पिंगे, आदर्श हायस्कुल चे मुख्याध्यापक सारीपुत्र जाभूळकर, राष्ट्रीय हरित सेना विभाग प्रमुख, स्काऊट मास्तर बादल बेले, वर्गशिक्षक रुपेश चिडे, विकास बावणे, शाळेतील सर्व शिक्षक वर्ग, पालक यांनी अभिनंदन केले. आदर्श शाळेने कुस्ती या खेळात पहिल्यांदाच प्रवेश केला. व पहिल्याच प्रयत्नात विध्यार्थीनी घवघवीत यश संपादन केले. नागपूर येथे होणाऱ्या शालेय कुस्ती स्पर्धेत दोघेही प्रतिनिधित्व करणार आहे. संकेत गणपत मोहितकर व सुरज हरिश्चंद्र सोलनकर हे विध्यार्थी सुद्धा सहभागी झाले होते.
COMMENTS