रोटरी क्लब राजुराच्या वतीने १२ गरजू विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप

HomeNewsनागपुर डिवीजन

रोटरी क्लब राजुराच्या वतीने १२ गरजू विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप

गौतम नगरी चौफेर राजुरा (ता. ३० जून):रोटरी डिस्ट्रिक्ट ग्रँड प्रोजेक्ट अंतर्गत रोटरी क्लब राजुराच्या वतीने आज राजुरा येथील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना मोफत सायकलचे वाटप करण्यात आले.

या उपक्रमा अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय, इंदिरा गांधी डिजिटल प्राथमिक शाळा व जिल्हा परिषद हायस्कूल, राजुरा येथील एकूण १२ विद्यार्थ्यांची निवड संबंधित शाळांच्या शिफारशीनुसार करण्यात आली होती.

कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी जिल्हा परिषद हायस्कूलचे मुख्याध्यापक ऊईके सर, महात्मा फुले विद्यालयाच्या प्राचार्य स्मिता धोटे मॅडम, इंदिरा गांधी शाळेचे मुख्याध्यापक बंडू ताजने सर तसेच रोटरी क्लब राजुराचे अध्यक्ष सारंग गिरसावळे, सचिव निखिल चांडक, माजी अध्यक्ष नवल झंवर, कमल बजाज, मोहनदास मेश्राम आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.

या वेळी अध्यक्ष सारंग गिरसावळे यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात सायकल वाटप मागील रोटरी क्लबची सामाजिक बांधिलकी स्पष्ट करत, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासात मदतीचा हात देण्याची भूमिका मांडली.

कार्यक्रमासाठी रोटरी क्लबचे सदस्य मयूर बोनगिरवार, अभिषेक गंपावार, डॉ. अमोघ कल्लुरवार, अहमद शेख, अमोल कोंडावार, किशोर हिंगाणे, सुबोध डाहुले, विनोद चन्ने आदींची उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन अॅड. जीवन इंगोले यांनी केले तर आभार प्रदर्शन रोटरी क्लबचे सदस्य राजू गोखरे यांनी केले.
विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांनी या उपक्रमाचे मनःपूर्वक स्वागत केले.

COMMENTS

You cannot copy content of this page