– शहीद भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंती प्रकरणी विभाग नियंत्रक , राजुरा आगार प्रशासन व अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद संघटनेसोबत सकारात्मक बैठक.
– 11 डिसेंबर चे चक्का जाम आंदोलन आदिवासी संघटनेने केले स्थगित.
गौतम नगरी चौफेर – बादल बेले राजुरा १० डिसेंबर
दिनांक 15 नोव्हेंबर 2025 रोजी राष्ट्रीय शहीद भगवान बिरसा मुंडा यांची 150 वी जयंती साजरी करण्याचे निर्देश असताना राजुरा आगारात उशिरा हा जयंती कार्यक्रम घेण्यात आला. तसेच भगवान बीरसा मुंडा यांची फोटो प्रतिमा अडगळीत ठेवल्याने आदिवासी संघटना आक्रमक होत संबंधित अधिकारी कर्मचारी यांना निलंबनाची कार्यवाही करावी अशी मागणी जोर धरू लागली. या अनुषंगाने दिनांक 11 डिसेंबर ला चक्काजाम आंदोलन करण्यात येणार असे निवेदन आदिवासी संघटनांनी दिल्याने त्या अनुषंगाने दिनांक 10 डिसेंबर रोजी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद नवी दिल्ली या संघटनेचे ऍड. डॉ. मधुकर कोटनाके , विदर्भ महासचिव तसेच मनोज आत्राम अध्यक्ष शाखा राजुरा यांचे सोबत विभाग नियंत्रक स्मिता सुतवणे , आगार व्यवस्थापक राजेश बोधे तसेच संघटना प्रतिनिधी यांच्यामध्ये सकारात्मक चर्चा झालेली आहे आणि राज्य परिवहन प्रशासनाने नियोजित वेळेत जयंती साजरी न केल्याबद्दल उपस्थित प्रतिनिधींच्या समोर जाहीरपणे क्षमा याचना करत दिलगिरी व्यक्त केली आहे. यापुढे थोर महापुरुषांच्या जयंती पुण्यतिथी वेळेत साजरी करण्यात येईल याची राज्य परिवहन प्रशासनाने संघटनेला ग्वाही दिल्याचे प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.
COMMENTS