गौतम नगरी चौफेर (सविस्तर भावार्थ ): मित्रा, अशा माणसाशी मैत्री कर, जो सहजपणे देखील कोणाशीही खोटे बोलत नाही. ज्याचा स्वभाव सहनशील आणि सरळ आहे, जो आपले दुःख कोणाला सांगत नाही आणि इतरांची काळजी करत असतो. “खऱ्या मित्राची ” चार लक्षणे सांगितली आहेत: सत्यवादी:- असा माणूस जो गंमतीने, रागात किंवा सहज बोलताना देखील कधी खोटे बोलत नाही. त्याच्या तोंडून नेहमी सत्यच बाहेर पडते. सहनशील आणि सरळ स्वभावाचा :- सहनशीलता सरळवृत्तीची, वागणूक ज्याचीजो मनाने प्रामाणिक आहे, चुगली करित नाही. आणि आयुष्यात येणाऱ्या अडचणी, अपमान सहन करण्याची ताकद ठेवतो. कोणावर पटकन रागवत नाही. स्वतःचे दुःख लपवणारा :- स्वतःला कितीही त्रास झाला तरी तो दुसऱ्यांसमोर रडत बसत नाही. तक्रार करत नाही. दुसऱ्याची काळजी करणारा :-चिंता इतराची पण स्वतःचे दुःख न सांगता, तो नेहमी दुसऱ्यांच्या अडचणीची, दुःखाची काळजी करतो. दुसऱ्याला मदत करायला पुढे असतो.*_ _*ज्याचे चारित्र्य स्वच्छ आहे, राहणीमान साधे आहे, जो कोणाचीही निंदा करत नाही. ज्याची रोजची दिनचर्या सतत योग्य आहे आणि ज्याला मान-सन्मानाची हाव नाही. निर्मळ चारित्र्य :-चरित्र निर्मळ ज्याचे मन आणि वागणूक दोन्ही स्वच्छ आहे. ज्याच्या मनात कोणाविषयी वाईट विचार नाही. तो कधी कोणाला फसवत नाही. साधी राहणी :-दिखावा करत नाही. उगाच महागड्या गोष्टी, मोठेपणा मिरवत नाही. साधे राहून, साधे कपडे घालून समाधानी जीवन जगतो. निंदक नसणे :-निंदि न कवणासी जो कधीच कोणाची चुगली, निंदा किंवा टिका करत नाही. इतरांचे गुण बघतो, अवगुण शोधत बसत नाही. योग्य दिनचर्या आणि निरहंकारी :- `दिनचर्या सकाळी लवकर उठणे, काम वेळेवर करणे अशी त्याची रोजची दिनचर्या शिस्तबद्ध असते. आणि त्याला लोकांनी “वाह-वाह ” करावे, मोठेपणा मिळावा अशी अजिबात हाव नसते. तो शांतपणे आपले काम करतो._ ह्या शेवटच्या कडव्यात कवी “तुकडोजी महाराज ” एका आदर्श माणसाचा शेवटचा आणि सर्वात मोठा गुण सांगतात : जो समाजातील गरीब, अशिक्षित, दुःखी, दुर्लक्षित लोकांना वर उचलण्यासाठी मनापासून निश्चय करतो. फक्त स्वतःसाठी न जगता, इतरांना मदत करण्यासाठी कंबर कसून कामाला लागतो. “कमाल ” म्हणजे पूर्ण ताकदीनिशी प्रयत्न करणे. राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज म्हणतात:- असा माणूस जरी स्वतःच्या कीर्तीचा विचार करत नसेल, तरी त्याचे नाव आपोआप मोठे होईल. समाजसेवा करणारा माणूस नक्कीच आयुष्यात “तरतो ” म्हणजे यशस्वी होतो आणि लोकांच्या मनात अमर होतो.
एकूण तात्पर्य: जो गरीब आणि गरजू लोकांसाठी निस्वार्थपणे काम करतो, तोच खरा मोठा माणूस आहे. त्याचीच कीर्ती आपोआप पसरते खरी मैत्री आणि खरे माणूसपण म्हणजे– सत्य, साधेपणा, सहनशीलता आणि समाजसेवा, दुसऱ्याची काळजी करणारा, निर्मळ चारित्र्याचा, साधा आणि अहंकार नसलेला. अशी मैत्री म्हणजे खरा ठेवा आहे. अशा माणसाशी मैत्री केली तर आयुष्यात कधी फसवणूक होत नाही.*
श्रीगुरुदेव उपासक : देवीदास लाखे (माजी सैनिक, आर. बी. आय. रिटायर्ड. M N. 9422921286 )
🤝🤝🤝🤝🤝🤝🤝👍🏻👍🏻