गौतम नगरी चौफेर (मुंबई ) – करण्यासाठी दिवसेंन दिवस भीम अनुयायांची प्रचंड गर्दी वाढत आहे. आजही दादर चैत्यभूमी ते वरळी पर्यंत सुमारे दोन अडीज किलोमीटर पर्यंत दोन दिवस रात्र लोक शिस्तबद्ध पद्धतीने रांगेत उभे होते. भारतीय बौद्धमहासभा, समता सैनिक दल यांनी दर्शनासाठी लोकांची रांग लावण्यासाठी चोख व्यवस्था ठेवली होती. ठिकठिकाणी पाणी, बिस्कीट, नाष्टा आदि. व्यवस्था केली होती.
बृहन्मुंबई महानगरपालिका तर्फे शिवाजी पार्क येथे भव्य मंडप उभारून खाली ताडपत्री टाकून लोकांची राहण्याची उत्तम व्यवस्था ठेवली होती. फिरते स्नानगृह, सौचालय यांची सोय केली होती. महापालिके मार्फत बुद्धमूर्ती, फोटो, पुस्तके, कॅलेण्डर, साहित्य प्रदर्शन आणि वस्तू विक्री यांचे नियोजन करण्यात आले होते.

अखिल भारतीय सर्वसाधारण विमा अनु. जाती जमाती कल्याणकारी संघ, सर्वसाधारण विमा निगम, न्यू इंडिया ए्शुरन्स मार्फत लोकांचा मोफत विमा काढण्यात येत होता. इंडियन ऑइल कारपोरेशन, हिंदुस्थान पेट्रोलियम, रिझर्व बँक, मुंबई जिल्हा न्यायालयीन कर्मचारी संघ, भारतीय विद्यार्धी मोर्चा, मुंबई महानगरपालिका यांचे मार्फत मोफत भोजनाची चहा, नाष्टा आदीची सोय करण्यात आली होती. परिवर्तन संस्था, श्रमिक महिला संस्था, बहुजन राष्ट्रसमिती आदि. विविध संस्था संघटने मार्फत पिण्याचे पाणी, फळे, पोहे, भिस्कीटे अलपोहार यांची व्यवस्था करण्यात आली होती.

शिवाजी नाट्य मंदिरात मोफत नाटक
————————————-
डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण केंद्र बार्टी पुणे यांच्या वतीने “शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला ” या नाटकाचा मोफत प्रयोग आयोजित करण्यात आला होता. महाराष्ट्र शासन सांस्कृतिक विभाग यांचे तर्फे “जागर संविधानाचा ” हा नाटकाचा मोफत प्रयोग आयोजित केला होता. तसेच विजयस्तंभ, बौद्धमय भारत असे नाटकाचे प्रयोग शिवाजी मंदिरात आयोजित करण्यात आले होते.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले ), राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार ), बहुजन समाज पार्टी, रिपब्लिकन सेना, भारतीय बौद्धमहासभा, यांच्या वतीने अभिवादन सभा पार पडल्या. वंचित बहुजन आधाडी मार्फत सह्यांची मोहीम राबविण्यात आली होती.
ये्कंदरीत प्रचंड गर्दीत आणि शांततेत महापरीनिर्वाण दिन पार पडला.



COMMENTS