गौतम नगरी चौफेर राजेश येसेकर तालुका प्रतिनिधी भद्रावती
भद्रावती : नुकतेच भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे 25 वे महाराष्ट्र राज्य अधिवेशन श्री कृष्ण लांस नाशिक येथे मोठया थाटा माटात त्रेवार्षिक संपन्न झाले यामध्ये सर्व जिल्ह्यातून महाराष्ट्रातून प्रतिनिधी उपस्थित होते. यामध्ये महाभव्य रॅली – उदघाटन सत्र – सभा प्रतिनिधी नोंदणी यामध्ये राष्ट्रीय नेते कॉम्रेड अमर जीत कौर – कॉम्रेड डॉ भालचंद्र कोंगो नवी दिल्ली हे उपस्थित होते. त्याच प्रमाणे राज्याचे नेते कॉम्रेड ऍड सुभाष लांडे – कॉम्रेड प्रकाश रेड्डी – कॉम्रेड शाम काळे – कॉम्रेड राजू देसले – कॉम्रेड डॉ महेश कोपुलवार – कॉम्रेड शिवकुमार गणवीर व इतर गणमान्य व्यक्ती उपस्थित होते. यात संघटनात्मक अहवाल मसुदा – राजकीय अहवाल मसुदा व तसेच राज्यस्तरीय व राष्ट्रीयस्तरावर तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा करण्यात आली. हे अधिवेशन तीन दिवस चालले यात चंद्रपूर जिल्ह्यातून कॉम्रेड राजू गैनवार – कॉम्रेड रवींद्र उमाटे – कॉम्रेड विनोद झोडगे पाटील – कॉम्रेड वंदना गैनवार – कॉम्रेड कुंदा कोहपरे इत्यादीनी उपस्थित राहून प्रतिनिधित्व केले. राज्यातून आलेल्या प्रतिनिधिनी संघटनात्मक व राजकीय अहवाला वर चर्चेत भाग घेतला व नवीन राज्य कार्यकारणी पदाधिकारी व सदस्य व कौन्सिलची निवड करण्यात आली. आणि क्रांतिकारी गीतांनी कार्यक्रमाची सांगता झाली



COMMENTS