गौतम नगरी चौफेर //चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी, कृष्णा चव्हाण.
जिवती – दिनांक 9 5 2025 रोजी मोजा कोठा येथे गोपले परिवार व कांबळे परिवार यांचा विवाह सोहळा संपन्न झाला या विवाह सोहळ्यात वधू वरास शुभ आशीर्वाद देऊन भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या व 20 तारखेला मुंबई येथील आझाद मैदानावर होणाऱ्या महाआंदोलनास काही दिवस उरले असताना मातंग समाजातील कार्यकर्ते अत्यंत तळमळीने समाजाच्या प्रत्येक कार्यक्रमात उपस्थित राहून समाजाला वेगवेगळ्या मार्गाने मार्गदर्शन करून आरक्षण वर्गीकरण कसे महत्त्वाचे आहे पटवून देण्यासाठी सर्वच कार्यक्रमातून प्रबोधन करण्याचा सपाटा सुरू केला असल्यामुळे या आंदोलनाला मोठी गती येऊन प्रसार प्रचार समाजामध्ये झाल्याने समाज पेटून उठत असल्याचे चित्र अनेक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून ऐकायला मिळत आहे सर्व समाज बांधवांनी उपस्थिती राहण्यासंदर्भात त्यांना मार्गदर्शन करण्यात आले यावेळी प्रा, सुग्रीव गोतावळे यांनी आरक्षण उपवर्गीकरणावर मार्गदर्शन केले तर प्रमुख उपस्थिती मुंबई ठाणे येथील डॉ, विश्वनाथ गायकवाड साहेब नाशिक येथील तोगरे साहेब श्री विजय गोतावळे श्री प्रशांत मोरे श्री बाबू मोहाळे श्री मधुकर गोपले श्री बाराशे वाघमारे श्री दिगंबर कलवले श्री बठवाडे श्री टोम्पे श्री चरणदास केदासे श्री भानुदास जाधव श्री देविदास कांबळे श्री संभाजी आडेसर व अन्य समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते,





COMMENTS