हिरापूर येथे भाजपा कार्यकर्त्यांच्या वतीने भाजपा महायुतीचे नवनिर्वाचितआमदार देवरावदादा भोंगळे यांच्या विजयी मिरवणूकीचे उत्सहात आयोजन

HomeNewsनागपुर डिवीजन

हिरापूर येथे भाजपा कार्यकर्त्यांच्या वतीने भाजपा महायुतीचे नवनिर्वाचितआमदार देवरावदादा भोंगळे यांच्या विजयी मिरवणूकीचे उत्सहात आयोजन

गौतम नगरी चौफेर (विशेष प्रतिनिधी हिरापूर (आवारपूर) – राजुरा विधानसभा क्षेत्रातील जनतेने विकास व्हिजन ला दिला कौल: प्रमोदजी कोडापे कोरपणा तालुका भाजपा महामंत्री कोरपणा तालुक्यातील हिरापूर येथे राजुरा विधानसभा क्षेत्राचे भाजपा महायुतीचे नवनिर्वाचित आमदार देवरावदादा भोंगळे यांच्या विजयाची मिरवणूक हिरापूर येथे ढोल ताशाच्या गजरात कार्यकर्त्यांनी पेढे, मिठाई वाटून फटाके फोडून विजयी आंनदोत्सव साजरा केला. नवनिर्वाचित आमदार निश्चितच राजुरा विधानसभा क्षेत्राच्या प्रगतीसाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करेल व विकासनिधी खेचून आणेल व विधानसभा क्षेत्राचा विकास साधेल असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. यावेळी भाजपा महामंत्री माजी सरपंच सदस्य ग्रामपंचायत हिरापूर प्रमोदजी कोडापे, हिरापूर येथील भाजपा जेष्ठ नेते मारोती पा. ठाकरे, भाजपा शाखा अध्यक्ष भास्करजी विधाते, शेषराज शिलरकर, ग्रा. पं. सदस्या माया सिडाम, महिला आघाडीच्या रुकमाबाई चौधरी समशेरजी शेख, माजी ग्रा. पं सदस्य रवींद्र आत्राम, बशीरजी शेख, संजयजी बोढे कुलदीप पडवेकर, विशाल पावडे सोमेश्वर जोगी, सदाशिव टिपले, सिकंदर वाघमारे, महेंद्र वाघमारे, मारोती मडचपे, गजानन सिडाम, मोरेश्वर, अर्जुन पंधरे, वसंत विधाते, गुलाब सिडाम, बंडू बोढे, अमोल विधाते, दादाजी लोढे, अजय मडावी प्रफुल बोढे, आदी हिरापूर भाजपा कार्यकर्तेबहुसंख्येने उपस्थित होते.

COMMENTS