महाराष्ट्र शासन मान्य पत्रकार संघातील पत्रकारांचे होणार विशिष्ट “ड्रेस कोड”

HomeNewsनागपुर डिवीजन

महाराष्ट्र शासन मान्य पत्रकार संघातील पत्रकारांचे होणार विशिष्ट “ड्रेस कोड”

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस संजीव भांबोरे यांची सुचना व दिला हिरवा कंदील •

गौतम नगरी चौफेर (प्रेस कार्यालय भंडारा)
भंडारा : पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून कधीकाळी तणावपूर्ण वातावरणात वृत्त संकलन करणाऱ्या पत्रकारांची पोलीस प्रशासनाला ओळख व्हावी. यासाठी महाराष्ट्र शासन मान्य प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य कडून या संघातील पत्रकारांना विशिष्ट ड्रेस कोड देण्यासाठी राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे यांनी मान्यता दिली आहे. याची सुरूवात मुंबई, रायगड, रत्नागिरी सह आता भंडारा जिल्ह्यातील पत्रकारांना सुद्धा असे ड्रेस कोड देण्यासाठी जिल्हा अध्यक्ष आशिष चेडगे यांनी पुढाकार घेतला आहे.

महाराष्ट्र शासन मान्य प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य मुंबई संस्थापक अध्यक्ष मा. डी. टी. आंबेगावे यांना यासंदर्भात राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे यांनी मुंबई मुख्यालयाला तशी सुचना दिली असून मुंबईहून या नाविन्यपूर्ण उपक्रमाला भंडारा जिल्ह्यात सुद्धा हिरवा कंदील मिळाला आहे. ही अत्यंत महत्त्वाची व अभिमानास्पद बाब असून शासनमान्य पत्रकार संघातील सर्व पत्रकारांची सार्वजनिक ठिकाणी, शासकीय कार्यक्रमात, तणावपूर्ण वातावरणात वृत्त संकलन करतांना पत्रकारांची विशेष ओळख व्हावी यासाठी लवकरच भंडारा जिल्ह्यात ही पत्रकारांना ड्रेस कोड योजना सुरू केली जाणार असल्याचे महाराष्ट्र शासन मान्य प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ भंडारा जिल्हा अध्यक्ष आशिष चेडगे यांनी सांगितले आहे.

🛑 सदर शासनमान्य पत्रकार संघातील हे ड्रेस कोड मधील वर्णन लाल हाफ शर्ट, काळा पॅंट आणि शर्टावर शासनमान्य पत्रकार संघाचे लोगो असून प्रेस नमूद केले आहे. हा ड्रेस कोड लवकरच पत्रकारांना प्रदान केले जातील असे भंडारा जिल्हा कार्यालय साकोली कडून कळविले आहे. या अभिनव उपक्रमाचे संघातील सर्व पत्रकारांनी स्वागत केले असून राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे यांचे मनापासून आभार मानले आहे.
गौतम नगरी चौफेर नियमित्त  वाचा 💙

COMMENTS

You cannot copy content of this page