साकोलीत वृक्षांचा द्वितीय वाढदिवस साजरा

HomeNewsनागपुर डिवीजन

साकोलीत वृक्षांचा द्वितीय वाढदिवस साजरा

खोब्रागडे कुटूंबीयांचा आदर्श • जिल्हा परिषद हायस्कूलचे सहकार्य

गौतम नगरी चौफेर //संजीव भांबोरे भंडारा- साकोली येथील जि. प. सेवानिवृत्त शिक्षिका सिंधू राधेश्याम खोब्रागडे यांनी ३० जून २०२३ ला त्यांच्या वयाच्या ५८ व्या वर्षी सेवानिवृत्तीला जिल्हा परिषद हायस्कूल परीसरात ५८ वृक्षांची लागवड केली. त्या वृक्षांचा आज ( सोम. ३० जून ) ला द्वितीय वाढदिवस येथे साजरा करण्यात आला. याप्रसंगी जि. प. हायस्कूल प्रशासनाचे अतुल्य सहकार्य लाभले. खोब्रागडे कुटूंबीयांनी हा नवा आदर्श शहरात प्रस्थापित केला आहे. तर दरवर्षी येथे वाढदिवस शेणखताचा केक कापून साजरा केला जातो हे उल्लेखनीय.
            सेवानिवृत्त शिक्षिका सिंधू राधेश्याम खोब्रागडे यांनी आपल्या  सेवानिवृत्तीच्या दिवशी वयाची ५८ वर्ष पूर्ण झाल्यामुळे रोडच्या दोन्ही बाजूंनी रॉयल पॉमची ५८ झाडांची २०२३ ला लागवड केली होती. तसेच संपूर्ण झाडांना ठिबक सिंचनाची व्यवस्था सुद्धा से. नि. शिक्षिका सिंधू खोब्रागडे यांनी केली असून सर्व झाडे आज जिवंत आहेत. त्यानिमित्त आज झाडांचा दुसरा वाढदिवस साजरा करून झाडांना शेणखताचा केक भरवण्यात आला. यावेळी राधेश्याम खोब्रागडे यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले की, सर्वांनी आपल्या जन्मदिनी “एक पेड मॉं के नाम” ही मोहीम राबवावी, ठिबक सिंचनाद्वारे पाणी पुरवठा कसा करता येईल याचे विशेष महत्त्व समजावून सांगितले व आपला निसर्ग कसा हिरवेगार ठेवता येईल असे मार्गदर्शन केले. सिंधू खोब्रागडे यांनी सांगितले की मुलांनी हायस्कूल परीसरात येता जातांनी या वृक्षांना पाणी घालून त्याच्या सुरक्षेसाठी लक्ष केंद्रित करावे. यावेळी उपस्थित जिल्हा परिषद हायस्कूल मुख्याध्यापक धर्मेंद्र कोचे, शिक्षक बाळा  चव्हाण, किशोर पोगडे यांनीही मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ता प्रभाकर सपाटे, आशिष चेडगे, डि. जी. रंगारी, सामाजिक कार्यकर्ता सुरेश बोरकर, प्रा. भेंडारकर, लक्ष्मी डबरे, प्रा. डोये तसेच शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि परीसरातील नागरिक उपस्थित होते.

COMMENTS

You cannot copy content of this page