गौतम नगरी चौफेर (शिला धोटे) – खबरदार माझ्या पोलीस शिपायांना काही मण्हाल तर कामात अडथडा आनल्याचा गून्हा दाखल करीन ठाणेदार शिवाजी क़दम
यांनी शेतकरी संघटनेचे सरचिटनीस संतोष पटकोटवार यांना दिली धमकी राजुरा ते आदिलाबाद रस्ता उडन पुलाचे काम गडचांदुर शहरातील मुख्य महामार्गावर दोन्ही बाजूने टिनाचे पत्रे लावून ऊडान पूलाचे काम सूरू आहे, शहरात अनूचित प्रकार घडू नये कीवा अपघात होऊन कोणाचाही नाहक बळी जाऊं नये, या हेतुने वाहतुक नियंत्रणा संदर्भात दिनांक 07/01/2026 रोजी शेतकरी संघटनेचे सरचिटनीस संतोष पटकोटवार यांनी ठाणेदार शिवाजी कदम यांची भेट घेऊन वाहतुक पोलीस शिपाई रामसिंह पवार आणी श्रीनिवास सोडनर हे आपली जवाबदारी योग्य रीतीने पार पाडत नसून निवड अवैध वसूलीच्या मागे फिरत असून कर्तव्यात कसूर करीत असल्याने त्यांना तेथून हटविण्यात यावे त्या ऐवजी कर्तव्यदक्ष वाहतूक नियंत्रण पोलीस शिपाई तैनात करावें अशी लेखी स्वरूपाचे निवेदन शेतकरी संघटनेचे सरचिटनीस संतोष पटकोटवार यांनी मा,ठाणेदार शिवाजी क़दम यांना दिली, असता ठाणेदार शिवाजी क़दम यांनी वाहतुक नियंत्रण व्यवस्थित करण्याचे आदेश पोलीस शिपायांना दिले, दूस–या दिवशीं सकाळी ठीक दहा वाजता बसस्टाप चौकातील गर्दी पाहून वाहूतुक नियंत्रण पोलीसांना संतोष पटकोटवार यांनी सहजरित्या भेंट देऊन विचारना केली असता पोलीस शिपाई श्रीनिवास सोडनर याने रागाच्या भरात आम्ही तूमचा काय मह्णुन ऐकावे?? आमचे साहेब सांगेल आम्हाला तूम्ही कोण सांगणार??? साहेब सांगेला ते करु अशा ऊद्धट शब्दांचा वापर करून मोठया आवाजात बोलू लागला आणी लगेच ठाणेदार शिवाजी क़दम यांना जरा भी विलंब न करता फोन लावला व लगेच ठाणेदारांनी डरकाडी फोडली “”खबरदार जर माझ्या पोलीस शिपायांना कोन्ही काम सांगाल तर कामात अडथडा आनल्याचा गुन्हा दाखल करीन,””एक जबाबदार ठाणेदार व्यक्तिनी सामाजिक चळवळीत कार्य करणा–या एका संघटनेच्या पदाधिका-याला गुन्हा दाखल करण्याची धमकी देत असेल तर सामान्य नागरीकांचे काय?? असा गंभीर प्रश्न नागरीकापुढे निर्माण झाला असून पोलीसा बद्दल भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे , गडचांदुर शहरात कायदा सुव्यवस्था बाजूला ठेऊन अवैध दारू विक्री सट्टा पट्टी ओव्हरलोड आणी जूगारा सारखे नागरीकांना बेघर करणारे अवैध धंधे जोरात सूरू असून याकडे मात्र ठाणेदार शिवाजी क़दम यांनी जानीवपूर्वक दूर्लक्ष करीत असल्याचे आरोप शेतकरी संघटनेचे सरचिटनीस संतोष पटकोटवार यांनी केला आहे तसेच श्रीनिवास सोडनर आणी रामसिंग पवार या वसुलीबाज पोलीस शिपायांची गढचांदुर येथून तात्काळ हकालपट्टी करावी अन्यथा रास्ता रोको आंदोलन करण्याचा ईशारा शेतकरी संघटनेचे सरचिटनीस संतोष पटकोटवार यांनी दिला आहे.




COMMENTS