गौतम नगरी चौफेर (आवारपूर) चंद्रपूर : डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा समिती आणी भीमराव बहुउद्मेशिय संस्था आवाळपूर व आई रमाबाई आंबेडकर महिला मंडळाच्या वतिने गावातील विविध बौद्ध मंडळेचे कार्यकर्ते यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनी अभिवादन कार्यक्रम येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा समिती आवाळपूर वाचनालय परीसर, गडचांदूर ते अंतरगाव मेन रोड आवाळपूर येथेल डॉ बाबासाहेब आंबेडकर नगरात अभिवादन कार्यक्रंम आयोजित करण्यात आला होता.

सकाळी ९.३० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी सरपंच सौ प्रियंका दिवे, सदस्य सुरेश दिवे, या पुतळा समितीचे मुख्य संयोजक मुर्लिधरजी वानखेडे, समितीचे अध्यक्ष गौतम धोटे, समितीचे सचिव दर्शन बदरे, कार्यध्यक्ष रमेश खाडे, को.अध्यक्ष प्रमोद चांदेकर, केशव वानखेडे, शैलेश गावंडे,
शिक्षनतज्ञ व विज्ञानरत्न सामाजिक कार्यकर्ते राहुलदेव भगत यांच्या उपस्थितीत माल्यार्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली, या दरम्यान डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर मनोगत–शिल्पकार जीवनाचा भीम माझा होतारे, रंजल्या न गांजल्यांचा दीनदाता होता रे — भीमराया घे-तुझ्या या लेकरांची वंदना-सार्यकाळी ५.३० वा भारतीय नागरीक महिलांचे मुक्तिदाते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना गित गायनातून अभिवादन केले यावेळी आई रमाबाई महिला मंडळाच्या पुष्पाबाई बदरे, शिला धोटे, चेतना खाडे, शुद्धलेखा खाडे, यशोधरा चांदेकर, शितल ठमके, कल्याणी वानखेडे, सविता नारनवरे, धम्माबाई जीवने, सविता बदरे, गिरजाबाई चांदेकर, स्मिता बदरे, चैताली वानखेडे, सोनी सातपुते, श्नेया धोटे, आदी गावातील व डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा समितीचे सर्व कार्यकर्ते या अभिवादन कार्यक्रंमाला उपस्थित होते, सायंकाळी सहाच्या दरम्यान गावातिल सिध्दार्थ विहारातून अनुयायी एकञ आले, आलेल्या कार्यकर्त्यांनी भव्य रॅली कढून बाबासाहेबांनाअभिवादन केले,
या कार्यक्रंमाचे संचालन पुतळा समितीचे महासचिव दर्शन बदरे यांनी केले हे खरे






COMMENTS