एकोडी ग्रामरोजगार सेवक बदलविण्यात यावा यासाठी गटविकास अधिकारी साकोली यांना निवेदन

HomeNewsनागपुर डिवीजन

एकोडी ग्रामरोजगार सेवक बदलविण्यात यावा यासाठी गटविकास अधिकारी साकोली यांना निवेदन

गौतम नगरी चौफेर संजीव भांबोरे
भंडारा-
साकोली तालुक्यातील ग्रामपंचायत एकोडी अंतर्गत रोजगार सेवक घनश्याम लाला कोचे यांची सन 2007 ला ग्रामसभेमधून नियुक्ती करण्यात आली. परंतु गेल्या 10 वर्षा पासून रोजगार सेवक स्वतः काम करीत नसून त्याचे प्रतिनिधी काम पाहता.
म.ग्रा. रो.ह.योजने अंतर्गत येणारे सर्व काम आता शासनाने ऑनलाईन केलेले आहेत त्यामध्ये घरकुल, शौचालय, रस्ते, नाली, फळबाग व इतर कामाच्या ऑनलाईन फोटो पाठवावे लागतात परंतु ते सुद्धा ऑनलाईन काम त्यांचे प्रतिनिधी करीत असतात. म.ग्रा.रो.ह.योजने अंतंर्गत ग्रामसभेत सुद्धा कधीच उपस्तीत राहत नाही. पंचायत समिती मध्ये सुद्धा कागदपत्रे नेने आणणे किंवा कधीच पंचायत समितीच्या कामाला सुद्धा जात नाही ते काम सर्व त्यांचे प्रतिनिधी पाहत असतात. म्हणून प्रतिनिधी च्या भरवशावर काम करणारा ग्रामरोजगार सेवक नसावा व नवीन ग्रामरोजगार सेवक यांची नियुक्ती करावी यासाठी गटविकास अधिकारी पंचायत समिती साकोली यांना निवेदन देण्यात आले.
निवेदन देतांना, धनराज आगाशे, नरेश चौधरी, कैलास जांभुळकर, कार्तिक मेश्राम, टीकाराम द्रगकर, राधेश्याम नेवारे, सत्यपाल बोरकर, उपस्थित होते.

You cannot copy content of this page