– पर्यावरण संवर्धन व मानवता विकासाचा ध्यास हाच मैत्रीचा उद्देश खास.- सूनैना तांबेकर
गौतम नगरी चौफेरे – बादल बेले राजुरा – २८ मे ऐरवी मैत्रीच्या गप्पा सांगणारे विश्वास घात करुन मैत्रीला काळीमा फासणारी घटना घडल्यावर हळहळ व्यक्त करणारे आणि दुसरीकडे सत्तावीस वर्षांनी मैत्रीपूर्ण संबंध जोपासत आपली मैत्री छोट्याश्या वेली प्रमाणे असणारी आता तिचे रुपांतर वटवृक्षात झाल्याने त्याचे प्रतीक म्हणून राजुरा तालुक्यातील एक मोकळा श्वास या निसर्ग पर्यटन केंद्रात १९९८ नंतर एकत्रीत येत वृक्षारोपण, पर्यावरण संवर्धन हा संदेश देत अत्यंत साध्या पद्धतीने स्नेहमिलन घेणारे माजी विद्यार्थी.
गेल्या सत्तावीस वर्षांपासून वर्ग मित्र मैत्रिणी यांना एकत्रीत ठेवून सोशल मीडियाद्वारे विचारविनिमय करणाऱ्या माजी विद्यार्थी यांना सूनैना तांबेकर यांनी एकत्रीत आणले. राजुरा तालुक्यातील सुप्रसिद्ध चणाखा येथील एक मोकळा श्वास या निसर्ग पर्यटन केंद्रात सर्वजण एकत्रीत येऊन वडाच्या झाडाचे वृक्षारोपण केले. यावेळी गीता पहानपटे, रुपाली कासंगोटटूवार, अरुणा कवठे, उर्मिला म्हरसकोल्हे, किर्ती बानकर, वर्षा तूम्हाने, अनुश्री ताठे, माधुरी आस्वले, मंजू मुसळे, सोनाली वानखेडे, नीतू बुटले, विनय टिकले, मोहनदास मेश्राम आदी माजी विद्यार्थी एकत्रीत आले. सत्तावीस वर्षांपासून असलेली मैत्री वडाच्या झाडाप्रमाणे विशाल व्हावी आणि घट्ट व्हावी आपसातील सुख -दुःख, चांगले – वाईट अनुभव वाटून घेता यावे करीता आणि आपले पर्यावरण संवर्धन व मानवता विकासाप्रती योगदान असावं करीता सर्वानी जनजागृति करण्याचा संकल्प घेतं हा स्नेहमिलन सोहळा आयोजीत केला.
———————————————
सूनैना तांबेकर, माजी विद्यार्थीनी तथा नागपूर विभाग महिला उपाध्यक्षा, नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था सत्तावीस वर्षांपासून आम्ही सर्वजण सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्कात आहोत. शालेय जीवन पुर्ण करून आपआपल्या क्षेत्रात सर्वजण व्यस्त जीवन जगत आहेत. परंतु कुठेतरी सामाजिक बांधिलकी जपत आम्ही एक मोकळा श्वास या निसर्ग पर्यटन केंद्रात एकत्रीत येऊन वडाच्या झाडाचे वृक्षारोपण केले. आणि मैत्रीला या वृक्षाच्या माध्यमातून जिवंत ठेवून त्याचे वटवृक्षात रुपांतर व्हावे आणि पर्यावरण संवर्धन आणि मानवता विकासाचे कार्य आमच्या हातुन घडावे याकरिता आम्ही सर्वजण एकत्र येऊन हा स्नेहमिलन सोहळा पार पाडला असे मत सूनैना तांबेकर यांनी व्यक्त केले.



COMMENTS