उमेदवारांच्या परीक्षेचा आज निकाल लागला
गौतम नगरी चौफेर (गडचांदुर) – गेल्या २ डिसेंबर रोजी जिल्ह्यातील नऊ
नगरपालिका आणि एका नगरपंचायतासाठी मतदान झाले. नगराध्यक्ष ६३ आणि नगरसेवक पदाच्या १०८९ उमेदवारांच्या भाग्याचा फैसला रविवार (ता. २१) लागणार आहे. जिल्ह्यात नऊ नगरपालिका आणि एका नगरपंचायतीसाठी ६२.९७ टक्के मतदान झाले होते. मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज आहे. रविवारी सकाळी दहा वाजतापासून मतमोजणीला सुरवात झाली. दरम्यान घुग्घुस नगरपालिकेसाठी शनिवारी मतदान पार पडले. आणी आज रविवारी मतमोजणी झाली आहे दरम्यान (गडचांदूर) या शहराकडे आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांच्या निकालाचा धुराळा उडाला होता, त्यात आमच्या या राजुरा विधानसभा मतदार संघातील गडचांदुर नगरपरिषद निवडणुकीचा निकाल हाती आला आहे त्यात शेतकरी संघटना तसेच गोंडवाना गणतंत्र पार्टी समर्पित गडचांदुर शहर विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार श्री. निलेश शंकरराव ताजने यांचा दणदणीत विजयी झाला आहे. त्याबद्दल विविध नागरिकानी त्यांची गडचांदुर येथे प्रत्यक्ष भेट घेत अभिनंदन करत मंगलमय शुभेच्छा दिल्या.

दरम्यान गडचांदुर शहरातील नागरिक अनेक समस्यांना आज घडीला तोंड देत आहे, प्रदुषणाची सर्वात मोठी समस्या या गडचांदुर शहरात आहे, बाजारपेठ, महिला सबलीकरण, रस्ते, नाल्या, युवकांच्या समस्या, आरोग्य विषयक समस्या अश्या सर्व प्रश्नांना तोंड देण्यासाठी या निलेश ताजने यांच्या नेतृत्वाची गडचांदुर शहराला गरज होती, ती गरज आता या लोकशाहीच्या उत्सवातून पूर्ण झाली आहे. निलेश शंकरराव ताजने यांच्या माध्यामातून गडचांदुर शहराचा विकास एक नवी उंची गाठेल हा विश्वास नागरिकात आहे, त्यांच्या रूपाने सामजिक आणि विकासाची जान असलेलं नेतृत्व गडचांदुर शहराच्या नगराध्यक्ष पदी विराजमान झालं आहे. निलेश ताजने यांची जडणघडण ही सामजिक कार्यकर्ता म्हणून गडचांदूरात या शहरात झाली आहे, सामाजिक कार्यातून त्यांनी गडचांदुर शहर आणि परिसरात मोठे काम उभं केलं आहे हा विजय त्यांच्या कार्याची पोचपावती आहे, भविष्यात गडचांदुर शहराच्या विकासासाठी निलेश ताजने यांना सर्वोतोपरी सहकार्य करण्याची आमची भूमिका असणार आहे.

गडचांदुर नगरपरिषदेवर गोंडवाना गणतंत्र पार्टी समर्पित गडचांदुर शहर विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार निलेश ताजने यांच्यासह प्रभाग क्र. 1 मधून रामसेवक मोरे, प्रभाग क्र 2 सारिका डोर्लीकर, प्रभाग क्र. 4 मधून महेश आवारी, प्रभाग क्र. 5 मधून अश्विनी कांबळे, प्रभाग क्र. 8 मधून शेख ख्वाजा या नगरसेवक पदांच्या उमेदवारांचाही दणदणीत विजय झाला आहे त्यांचेही अभिनंदन करत गडचांदुर शहराच्या विकासासाठी अथक परिश्रम घेण्यासाठी त्यांना मंगलमय शुभेच्छा दिल्या. यासह या निवडणुकीत गोंडवाना गणतंत्र पार्टी आणि गडचांदुर शहर विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले आहे त्यामुळे कार्यकर्त्यांचेही या प्रसंगी अभिनंदन केले जात आहे —

COMMENTS