पिपरी पुनर्वसन येथे बुद्ध जयंती

HomeNewsनागपुर डिवीजन

पिपरी पुनर्वसन येथे बुद्ध जयंती

गौतम नगरी चौफेर / संजीव भांबोरे भंडारा – डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती पिपरी च्या वतीने “अत्त दीप भव” चा जगाला महान संदेश देणारे विश्वशांती दूत महाकारूणीक तथागत गौतम बुद्ध यांची जयंती साजरी करण्यात आली. या जयंती समारोहाचे अध्यक्ष राजेश वाल्मिके, प्रमुख अतिथी लिलाधर चवरे,  बाळकृष्ण भुरे, अरुण चन्ने,  रेकचंद चवरे, गौतम चवरे, प्रतिमा रामटेके, सुमन रामटेके यांच्या हस्ते महाकारुणिक तथागत बुद्ध व बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि बहुजन नायक कांशीराम यांच्या पूर्णाकृती पुतळ्यांना माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. सामूहिक बुद्ध वंदनेने बुद्ध जयंती ची सुरुवात करण्यात आली. बुद्ध आणि त्यांचा धम्म व त्यांच्या ऐतिहासिक जीवन कार्यावर व तत्त्वज्ञानावर समीक्षा चवरे यांनी प्रास्ताविकेतून प्रकाश टाकला. तर नाशिक चवरे यांनी बुद्ध पौर्णिमेचे ऐतिहासिक महत्त्व सांगून संपूर्ण जगाला युद्धाची नाही तर बुद्धांच्या विचाराची गरज असल्याचे सांगितले. राजेश वाल्मीके यांनीही बुद्धांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नाशिक चवरे यांनी केले तर प्रास्ताविक व आभार समीक्षा चवरे यांनी केले. जयंती कार्यक्रमात बहुसंख्य बौद्ध उपासक,  उपासिका यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता नितीन मेश्राम, कुंदा चवरे, मालू खोब्रागडे, भारती चवरे, वैशाली चवरे, आर्थिक चवरे, विक्की चवरे इत्यादींनी परिश्रम घेतले.

COMMENTS