गो. म. वेदक विद्यामंदिरचे श्री. विठ्ठल रेणुकर राज्यात द्वितीय

HomeNewsनागपुर डिवीजन

गो. म. वेदक विद्यामंदिरचे श्री. विठ्ठल रेणुकर राज्यात द्वितीय

व्यवसाय मार्गदर्शन व समुपदेशन स्पर्धेचे केले होते आयोजन
गौतम नगरी चौफेर संजीव भांबोरे
नागपूर – शिक्षणातील गुणवत्तेचा संवर्धनासाठी आणि शिक्षकांच्या सातत्यपूर्ण व्यावसायिक विकासासाठी शैक्षणिक वर्ष २०२४–२५ पासून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था, महाराष्ट्र, पुणे यांच्या वतीने राज्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक, तसेच पर्यवेक्षीय यंत्रणांतील अधिकारी/कर्मचारी यांच्यासाठी ४२ स्पर्धांचे आयोजन करण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम सुरू करणेत आला आहे. या अंतर्गत घेण्यात आलेल्या व्यवसाय मार्गदर्शन व समुपदेशन स्पर्धेमध्ये गो. म. वेदक विद्यामंदिर शाळेचे शिक्षक श्री. विठ्ठल रेणुकर यांचा राज्यात द्वितीय क्रमांक आला.
या स्पर्धेमध्ये त्यांनी आंतरविद्याशाखीय शिक्षणातून करिअरची संधी या विषयाचे सादरीकरण केले. सदर स्पर्धेमध्ये राज्यातील अमरावती, मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, छ संभाजीनगर, कोल्हापूर व लातूर अशा ८ विभागातून ४० स्पर्धक सहभागी झाले होते. श्री. रेणुकर यांनी कोरोना काळात राज्यातील ५०० शिक्षकांसाठी ऑनलाइन डिजिटल लिटरसीचे कार्यक्रम, संगणक विभागामार्फत त्यांनी २००० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना संगणकीय कौशल्याचे प्रशिक्षण, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० साठी उदयपूर, राजस्थान येथे झालेल्या शिक्षक प्रशिक्षणासाठी राज्यातून त्यांची निवड झाली होती. अविरत या शासनाच्या उपक्रमाचे राज्यस्तरीय तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून काम केले. रायगड जिल्ह्यातील शेतकरी, व्यावसायिक, विद्यार्थी व नोकरदार यांचे आर्थिक नियोजन व त्यांच्या गुंतवणुकीवर पी.एच.डी. चे संशोधन करीत आहेत. ऑनलाइन क्लासरूम चाचणीसाठी मुंबई विभाग स्तरावर समन्वयक म्हणून काम केले. विद्यार्थी सुरक्षितता व मुलींचे स्वसंरक्षण याचा राज्यस्तरावर घटकसंच बनविनेसाठी यांची निवड झाली होती.

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे जिल्हा कॅम्प असेसमेंट सेंटरचे संचालक म्हणून काम केले. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाच्या अनुषंगाने भारतीय उद्योजकता विकास व टाटा कम्युनिकेशन लिमिटेड, मुंबई मार्फत आर्थिक साक्षरता कार्यक्रम घेतले. नवोपक्रम स्पर्धेमध्ये जिल्ह्यात त्यांचा प्रथम क्रमांक मिळविला आहे. असे विविध उल्लेखनीय काम त्यांनी केले आहे.
या त्यांच्या यशाबद्दल संस्थेचे विश्वस्त श्री. मारुती शिर्के गुरुजी,अध्यक्ष श्री.मंगेश देशमुख, उपाध्यक्ष श्री. पुरुषोत्तम मुळे, सचिव महेंद्रशेठ कजबजे, कार्यकारी मंडळाचे सदस्य श्री. चंद्रकांत रोडे, डॉ.सतीश वडके, श्री.श्रीराम कजबजे, ॲड कौस्तुभ धामणकर, श्री.बी. के.पटेल, श्री. दीपक कोटिया, श्री. द. वा. सप्रे, श्री. बैकर शेठ, वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नानासाहेब यादव, मुख्याध्यापक श्री.दिलीप ढाकणे व शिक्षक कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

COMMENTS

You cannot copy content of this page