– शिक्षक संघ अध्यक्ष मुबारक सय्यद यांचे सावरबंध येथे प्रतिपादन
गौतम नगरी चौफेर संजीव भांबोरे भंडारा – जी मुले शाळेत गुरूजींचा मार नाही खाणार, ती पुढे पोलीस ठाण्यात पोलीसांचे डंडे मात्र नक्कीच खाणार, आणि ८०% टक्के क्लास वन अधिकारी हे जिल्हा परिषद शाळेतच शिकलेली आहेत तर फक्त २०% टक्के खाजगी कॉन्व्हेंट मधील असतील, खोटं असेल तर भंडारा जिल्हा येथे माहिती अधिकार लावा. सत्यता पुढे येईल” असे सत्य प्रतिपादन महाराष्ट्र राज्य प्राथ. शिक्षक संघ भंडारा जिल्हाध्यक्ष तथा मुख्याध्यापक मुबारक सय्यद यांनी केले. ते (शनि. २४ जाने.) ला वार्षिक स्नेहसंमेलनात सावरबंध येथे बोलत होते.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावरबंध, पं. स. साकोली येथे तीन दिवसीय स्नेहसंमेलनाचा शुभारंभ झाला. याप्रसंगी मंचावर जि. प. स. वनिता डोये, शिक्षक वक्ते मुख्याध्यापक मुबारक सय्यद, ता. आरोग्य अधिकारी डॉ. रूपेश बडवाईक, सरपंचा माधवी बडवाईक, केंद्र प्रमुख सुरेंद्र उके, पं. स. स. सरीता करंजेकर, शाळा व्यव. अध्यक्ष प्रमोद बडवाईक, डॉ. सुजाता साखरे, संदीप रामटेके, तं. मु. स. गोपाल बडवाईक, किशोर मोहबे, किशोर गडकरी आदी उपस्थित होते. येथे माजी विद्यार्थी समितीच्या सदस्यांचा सत्कार करण्यात आला. आपल्या रोखठोक भाषणातून मुबारक सय्यद यांनी खाजगी कॉन्व्हेंटच्या अव्याढव्य पैशांच्या मागणीवर बोलतांना चांगलेच धारेवर धरले होते. तर जिल्हा परिषदेचा विद्यार्थी हा निर्भिड आणि प्रभावशाली निर्माण होतो. तर कॉन्व्हेंटच्या दबावात मुले भित्रे आणि बोलता पोपट बनतो असे प्रतिपादन करीत शासकीय जिल्हा परिषद शाळांतील उच्च दर्जाचे शिक्षण यावर सविस्तर माहिती पालक जनतेला समजावून सांगितली. प्रास्ताविक मुख्याध्यापक संजय नंदेश्वर यांनी केले. तर संचालन चेतन बडवाईक व शिक्षिका प्रतिमा उपरीकर यांनी व आभार प्रदर्शन शिक्षिका मंगला पटोले यांनी केले.

या तीन दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलनात शाळा व्यव. उपाध्यक्षा शालू गभणे, निशीकांत बडवाईक, शिक्षिका मनिषा रहांगडाले, मंजूषा कठाणे, विद्यार्थी प्रमुख सोहम मेश्राम, विद्यार्थीनी सानिया खोब्रागडे, पारबता मेश्राम, कुंदा भालेकर, माजी विद्यार्थी अध्यक्ष व माजी सरपंच संजय बडवाईक, उपाध्यक्ष वर्षा बागडे, मनोज गभणे, पल्लवी रामटेके, मनोज बावनकर, भुमेश्वरी बागडे, भागवत मेश्राम, शितल बडवाईक, रोहीणी हुमणे, वंदना ऊके, विजया रामटेके, संजय एम. नंदेश्वर, नलिनी बडवाईक, बबिता बडवाईक, मयुरी बोरकर आणि सर्व पालक, सावरबंध येथील ग्रामस्थांनी सहकार्य केले.

COMMENTS