भारतीय लोक कलाकार सांस्कृतीक संघटना शाखा साकोली कार्यकारिणी गठीत

HomeNewsनागपुर डिवीजन

भारतीय लोक कलाकार सांस्कृतीक संघटना शाखा साकोली कार्यकारिणी गठीत

गौतम नगरी चौफेर संजीव भांबोरे भंडारा – दिनांक२६/०१/२०२६ रोजी शासकीय विश्रामगृह साकोली या ठिकाणी दुपारी ३ वाजता भारतीय लोक कलाकार सांस्कृतिक संघटना शाखा साकोली ची कार्यकारणी गठीत करण्यात आली. ती पुढील प्रमाणे प्रबोधनकार उमेश बोरकर तालुका अध्यक्ष, उपाध्यक्ष दिनेश नंदलाल कटरे मालुटोला, सचिव दिनेश टेंभरे मोखे, सहसचिव मनोज कुंजीलाल पारधी, कोषाध्यक्ष टोलीराम गोपाल लांजेवार, संघटक ज्ञानेश्वर बद्रू रामटेके, सहसंघटक कुणाल बोरकर, सहकोषाध्यक्ष नागेश्वर मेश्राम, तर सदस्य-ओमप्रकाश कांबळे, खुशाल लाडे, राजकुमार मेश्राम, अनिल कांबळे, संतोष सोनटक्के, भुवन सोनटक्के यांना कार्यक्रमाचे अध्यक्ष व भारतीय लो. क.सा. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष  प्रकाश काळे गुरुजी, राष्ट्रीय सचिव अनिलजी पारखी सर, प्रदेश अध्यक्षा माधुरी ताई घोडमोडे, नागपूर शहर महिला अध्यक्षा सौ. त्रिशिला फुलझेले, मार्गदर्शक लोकशाहीर अंबादासजी नागदेवे, भंडारा जिल्हा अध्यक्ष श्रीकांतजी नागदेवे, लाखनी ता. अध्यक्ष आर्यनजी नागदेवे, प्रबोधनकार तनुजा नागदेवे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन मनोज पारधी यांनी केले तर आभार उमेश बोरकर यांनी मानले. अशा प्रकारे सर्व पदाधीकारी व सदस्यांना नियुक्ती पत्र प्रदान करून पुढच्या वाटचाली करीता शुभेच्छा दिल्या व राष्ट्र गिताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

COMMENTS

You cannot copy content of this page