जिल्हा आदर्श व स्मार्ट ग्राम कळमनाला सीईओंची आकस्मिक भेट.

HomeNewsनागपुर डिवीजन

जिल्हा आदर्श व स्मार्ट ग्राम कळमनाला सीईओंची आकस्मिक भेट.

– सरपंच नंदकिशोर वाढई यांच्या विकास मॉडेलचे केले कौतुक.

गौतम नगरी चौफेर (सौ. सुवर्णा बादल बेले) –
   राजुरा  स्वच्छ, सुंदर, निर्मळ आणि पर्यावरणपूरक उपक्रमांमुळे राज्यात आदर्श स्मार्ट गाव म्हणून ओळखले जाणाऱ्या कळमना येथे जिल्हा परिषद चंद्रपूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह यांनी आकस्मिक भेट देत ग्रामविकास कामांची पाहणी केली. आयोजित पंचायतराज व्यवस्थेतील सर्व थीमचा प्रभावी वापर, लोकसहभाग आणि सरपंच नंदकिशोर वाढई यांचे लोकाभिमुख कार्य पाहून तसेच कळमना येथील वस्तुस्थिती पाहुन ते भारावले. यावेळी येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत आरोग्य शिबीर सुद्धा पार पडले.

विशेष बाब म्हणजे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत कळमना ग्रामपंचायतीने पांदनरस्ता क्षमदान, लोकवर्गणीतून पुलाचे रेलिंग, वाडीवस्ती रस्ते, घरकुल बांधकाम, शोषखड्डे, विहीर बांधकाम–पुनर्भरण, ठिबक सिंचन, शेवगा लागवड, शेळीपालन, आयुष्यमान भारत, संजय गांधी निराधार आदी विविध योजना प्रभावीपणे राबवल्या आहेत. सोशल मीडियावरील लोकप्रियतेमुळे तसेच ग्रामविकासाच्या नाविन्यपूर्ण मॉडेलमुळे राज्य–बाहेरील अनेक संघटनांनी कळमनाला भेट दिली असून ग्रामपंचायतीला मागील वर्षी ‘आर. आर. आबा पाटील सुंदर गाव’ पुरस्कारात जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळाला आहे.
       सीईओ पुलकित सिंह यांनी गावाच्या योजनाबद्ध विकासाचे कौतुक करत राज्यस्तरावर कळमना पोहचवण्यासाठी जिल्हा परिषदेकडून पूर्ण सहकार्य राहील, असे आश्वासन दिले. त्यांच्या कौतुकाबद्दल सरपंच नंदकिशोर वाढ ई यांनी मनःपूर्वक आभार मानत गावाच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प पुढेही कायम ठेवणार असल्याचे सांगितले.   

या प्रसंगी राजुराचे गटविकास अधिकारी डॉ. भागवत रेजिवाड,  विस्तार अधिकारी मेश्राम, उपविभागीय अभियंता मेंढे मॅडम, गटशिक्षणाधिकारी तोडे मॅडम, पोलीस पाटील बाळकृष्ण पिंगे, तमुस अध्यक्ष निलेश वाढई, लोहे सर, उपसरपंच कौशल्या कावळे, ग्रामपंचायत सदस्य साईनाथ पिपळशेडे, सुनीता उमाटे, प्रभाकर साळवे, महादेव ताजने, कवडु गौरकर, डॉ. लटारी बल्की, आनंदराव बोढाले, कवडु पिंगे, सुधाकर पिंपळशेंडे, उध्दव आस्वले, सुरेश गौरकर, विठ्ठल वाढई, महादेव आबीलकर, डॉ. कोल्हे मॅडम, धांडे मॅडम, देवाजी चापले, शेख बाबु, मदन वाढई, मारोती बल्की, अमोल निमकर, योगराज वांढरे, श्रीकांत कुकुडे, अरुण आस्वले, आशीष ताजने, मीना भोयर, संगीता उमाटे, सुचीता धांडे, सपना मेश्राम, गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते,बचत गटांच्या महिला यासह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आयोजित कार्यक्रमाचे संचालन दिलीप निमकर सर आणि आभार प्रदर्शन विलास गिरसावळे सर यांनी केले.

COMMENTS

You cannot copy content of this page