गोविंद विद्यालयात “एक पेड माॅं के नाम”

HomeNewsनागपुर डिवीजन

गोविंद विद्यालयात “एक पेड माॅं के नाम”

गौतम नगरी चौफेर श्रीकृष्ण देशभ्रतार भडांरा – गोविंद विद्यालय तथा विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, पालांदूर (चौ.) येथे “एक पेड माॅं के नाम” हा उपक्रम आयोजित करण्यात आला. प्राचार्य आ.बा. मदनकर सर यांनी वृक्षारोपण केले. यावेळी.प्रा. बारसागडे सर, प्रा. गीत्ते सर, प्रा .देशमुख सर, सौ. कुर्जेकर, कु. काशीकर शिवरकर , राऊत यांच्या उपस्थितीत उपक्रम आयोजित करण्यात आला. प्राचार्य श्री आ.बा मदनकर सर यांनी शाळेच्या परिसरात “एक पेड माॅं के नाम”या उपक्रमांतर्गत वृक्षारोपण करून झाडांचे जतन संवर्धन व महत्त्व पटवून दिले. तसेच संत तुकाराम महाराजांनी वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे या अभंगातून निसर्ग हा आमचा सखा व सोयरा असून तो आम्हाला सातत्याने ऑक्सिजनचा पुरवठा करतो. भविष्यात मानवाला निसर्गावर अवलंबून राहावे लागणार आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात विद्यार्थी व पालकांनी आपल्या घरी शेजारी मोकळ्या जागेत मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करून एक पेड माँ के नाम हा उपक्रम यशस्वी करावा असेही बोलताना ते म्हणाले. यावेळी विद्यार्थी, शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

COMMENTS

You cannot copy content of this page