भूसंपादित होणाऱ्या जमिनीचा आर्थिक मोबदला शासनाकडून मिळण्याची पट्टा धारक लाभार्थ्यांची मागणी उपविभागीय महसूल अधिकारी भंडारा यांना निवेदन
गौतमनगरी चौफेर (संजीव भांबोरे भंडारा( जिल्हा प्रतिनिधी) – भंडारा तालुक्यातील कोथुर्णा येथील आबादी भूखंडातून जाणाऱ्या नागपूर भंडारा गोंदिया दृतगती महामार्गासाठी भूसंपादित होणाऱ्या जमिनीच्या आर्थिक मोबदला शासनाकडून मिळावा या मागणी करिता पट्टाधारक लाभार्थ्यांची मागणी असून या मागणीचे निवेदन उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत भू-संपादन अधिकारी रामेश्वर कांबळे यांना दिनांक 26 जून 2024 ला निवेदनातून केलेली आहे . याबाबत सविस्तर वृत्त असे की ,भंडारा तालुक्यातील मौजा कोथुर्णा, तालुका जिल्हा भंडारा येथील गरजू लाभार्थ्यांना घर बांधकामासाठी तहसीलदार साहेब भंडारा यांच्या माध्यमातून सण १९९३ – ९४ यावर्षी आबादी मुकरर केलेली आहे. आबादी साठी जागा निश्चित करताना शासनाने कोणत्याही भौगोलिक परिस्थिती विचार न करता भूमापन क्रमांक १२२ ते१२५ या ठिकाणी आबादि ला मंजुरी दिली, परंतु तेव्हापासून सदर ठिकाणी दरवर्षी वैनगंगा नदीचा पूर येत असतो. या जागेचा स्थळ दर्शक भूखंडाचा लेआउट नकाशा मंजूर करून गरजू लाभार्थ्यांना “पट्टा प्रमाणपत्र” नमुना – अठरा चे तलाठी द्वारे दिनांक १२ डिसेंबर १९९६ ला वाटप करून ताबा देण्यात आला. परंतु सदर ठिकाण पूर प्रवण क्षेत्र असल्यामुळे तेव्हापासून आज पर्यंत एकही पट्टा धारक लाभार्थ्यांनी घर बांधलेले नाही तसे स्थानिक प्रशासन व ग्रामपंचायत प्रशासन यांनी पर्यायी व्यवस्था म्हणून दुसरीकडे नवीन आबादीसाठी जमीन मिळावी यासाठी शासनाकडे कोणताही पत्रव्यवहार मागणी केलेला नाही असे अधिकृत सूत्राकडून कळले आहे, घराची गरज भागविण्या साठी अत्यंत गरजू नागरिकांनी गावालगत पडीत जागेवर वाटेल त्या ठिकाणी बेसुमार जागा व्यापून अनाधिकृत व ग्रामपंचायत ची रीतसर परवानगी न घेता घरे बांधली. त्यामुळे मुलांना व वृद्धांना व्यायाम , मुलांना खेळण्यासाठी, कोठेही जागाच उरली नाही. जर नवीन ठिकाणी आबादी मिळाली असती तर, लाभार्थ्यांनी तिथे घरे बांधली असती व ग्रामपंचायतला घर टॅक्स च्या रूपाने आर्थिक लाभ झाला असता . तेव्हापासून सन १९९६-९७ ग्रामपंचायत पदाधिकाऱ्या अक्षम्य दुर्लक्षामुळे गरजू लाभार्थ्यांना घरापासून वंचित रहावे लागते व ग्रामपंचायतचे लाखो रुपयाचे आर्थिक नुकसान झाले याला जबाबदार कोण ? असा प्रश्न गावकरी आपसी चर्चेतून एकमेकांना विचारत आहेत.
आबादि अवधी मुकरर झालेल्या भूमापन क्रमांक१२२ ते १२५ या क्षेत्रातून नागपूर भंडारा गोंदिया शीघ्र संचार द्रुतगती राज्य महामार्ग क्रमांक- ७ जात आहे असे महाराष्ट्र शासन सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय मुंबई राजपत्र असाधारण भाग चार ब ची अधिसूचना दिनांक ०९फेब्रुवारी २०२४ ला अन्वये जाहीरपणे प्रसिद्ध झालेली आहे. व लवकरच भूसंपादन कार्यालय भंडारा ,द्वारा सदर राज्य महामार्गाच्या बांधकामासाठी बांधकामासाठी भूसंपादनाची प्रक्रिया व कार्यवाही सुरू करण्यात येणार आहे .तरीपण शासनाकडून मौजा कोथुर्णा येथील आबादीच्या भूखंडातून जाणाऱ्या द्रुतगती राज्य महामार्ग करिता भूसंपादन करताना आबादी भूखंड धारक लाभार्थ्यांना शासकीय नियमाप्रमाणे( नवीन भूसंपादन कायदा) अंतर्गत आर्थिक मोबदला मिळावा अशी आबादी भूखंड धारक लाभार्थ्यांची ज्वलंत मागणी आहे.
उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत भू-संपादन अधिकारी यांना रामेश्वर कांबळे यांना लेखी निवेदनातून गणेश मलेवार, प्रहार चे माजी जिल्हाध्यक्ष अंकुश वंजारी, शिवसेना ठाकरे उबाठा गटाचे भंडारा पवनी विधानसभा प्रमुख नरेंद्र पहाडे सामाजिक कार्यकर्ता भंडारा ,आकाश वाडीभस्मे , उमेद पटेल , यांनी केलेली आहे.
COMMENTS