राजुरा विधानसभेतील मतदारांनी संधी दिल्यास मतदारसंघात बदल घडेल. देवरावदादा भोंगळे
गौतम नगरी चौफेर (हिरापूर प्रमोद कोडापे) – कोरपणा तालुक्यातील हिरापूर येथे भारतीय जनता पार्टी ची बूथ कार्यकर्ता संवाद सभा संपन्न दिनांक 17.10.2024 ला झाली. या संवाद सभेचे मार्गदर्शक माजी जि.प. अध्यक्ष तथा राजुरा विधानसभा भाजपा निवडणूक प्रभारी देवरावदादा भोंगळे हे होते. सोबत भाजपा तालुकाध्यक्ष संजयजी मुसळे, ता.महामंत्री सतीशजी उपलेंचीवार, ता.महामंत्री विजयराव रणदिवे, ता.महामंत्री तथा माजी सरपंच, सदस्य ग्रा. हिरापूर प्रमोद कोडापे, चंद्रपूर बाजार समितीचे संचालक पारसजी पिंपळकर, जिल्हा युवा मोर्चा उपाध्यक्ष आशिष ताजने, ता. उपाध्यक्ष शशिकांत आडकीने, पुरुषोत्तम भोंगळे, प्रमोद पायघन, नांदा युवा मोर्चा महामंत्री रवी बंडीवार, सुजितजी ठाकूर ग्रा. पं सदस्या मायाताई सिडाम, हिरापूर भाजपा जेष्ठ नेते मारोती पा. ठाकरे, अंतरगाव (बु) सोसायटी संचालक शेषराज पा. शिलारकर, बूथ प्रमुख भास्कर विधाते, विशाल पावडे, माजी. ग्रा. पं. सदस्य रवींद्र आत्राम आदी विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.
विविध कल्याणकारी योजना केंद्र सरकार, राज्य सरकार, देश, राज्य पातळीवरील विकासकामे आदी विषयावर देवरावदादा भोंगळे यांनी मार्गदर्शन करून बदल घडवायचा असेल तर भाजपा सोबत राहून मतरूपी आशीर्वाद देऊन विधानसभा जिकंवावी, निश्चितच बदल घडवून दाखवेल असा विश्वास व्यक्त केला. यावेळी सोमेश्वर जोगी, बशीरजी शेख, कुलदीप पडवेकर, बंडू बोढे, नथुजी गायकवाड, गजानन सिडाम, सावन वाघमारे, मारोती मडचापे, महेंद्र वाघमारे कवडू खुजे, वसंत विधाते, विलास काळे, गुलाब सिडाम, प्रमोद शंभरकर, अर्जुन पंधरे, सिकंदर वाघमारे, अमोल गोरे, अमोल विधाते, देवराव ठाकरे, मनोज कामटकर, बाला कोडापे, विशाल कोडापे, संजय गुरनुले, मोरेश्वर आडे, वैजनाथ नलबले, रावजी येलमूले ज्ञानोबा पिटलेवार, अनिल तुमराम, मारोती कोडापे, अविनाश कोडापे व आदी महिला भगिनी उपस्थित होत्या. 🙏
COMMENTS