भारतीय संविधान हा संपूर्ण भारतीयांचा सन्मानाने जगण्याचा व अधिकाराचा मसौदा – ॲड.डॉ.सत्यपाल कातकर

HomeNewsनागपुर डिवीजन

भारतीय संविधान हा संपूर्ण भारतीयांचा सन्मानाने जगण्याचा व अधिकाराचा मसौदा – ॲड.डॉ.सत्यपाल कातकर

गौतम नगरी चौफेर संजीव भांबोरे चंद्रपूर (राजुरा)- दि लक्कडकोट (पेसा ) फाउंडेशन आणि लक्कडकोट कर्मचारी संघ मर्या. लक्कडकोट द्वारा दिनांक २९ नोव्हेंबर २०२५ ला संविधान दिवस, संयुक्त जयंती, समाजप्रबोधन व सत्कार समारोह आयोजित करण्यात आले होते. सदर कार्यक्रमात उदघाटक प्रसिद्ध मनोवैज्ञानिक, डॉ.सत्यपाल कातकर, अधिवक्ता, उच्च न्यायालय तथा संविधानतज्ञ यांनी मार्गदर्शन केले. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज,डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मौलाना अब्दुल कलाम आझाद, पंडित जवाहरलाल नेहरू, भगवान बिरसा मुंडा, महात्मा ज्योतिबा फुले, शामदादा कोलाम यांचे प्रतिमेस उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

त्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षा पात्र करून पोलीस उपनिरीक्षक पदासाठी निवड झालेल्या लक्ष्मीकांत दुर्गे, अजय मडावी, तर सातव्या वर्गात प्रथम आलेली रोहिणी उपरे, दहाव्या वर्गात गुणवत्ता प्राप्त सुहाना काशिम शेख, बारावीत गुणवताप्राप्त लक्ष्मीप्रसन्न पांडुगवार ह्यांचा सत्कार करण्यात आला . त्यानंतर कोलाम आदिम जमात फौंडेशनचे अध्यक्ष आयुष मडावी, लक्ष्मण लाडसे ह्यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या तर कार्यक्रमाचे उदघाटक प्रसिद्ध मनोवैज्ञानिक, माजी प्राचार्य, डॉ.सत्यपाल कातकर, संविधानतज्ञ तथा अधिवक्ता, उच्च न्यायालय उपस्थित जनतेस मार्गदर्शन करताना म्हणाले, “भारतीय संविधान हे कथा,कविता, आत्मचरित्र वा साहित्यिक पुस्तक नव्हे तर भारतीय संविधान सर्व भारतीयांचे सन्मानाने, कायदेशीर अधिकार, मौलिक अधिकार व संविधानिक अधिकार देणारा संपूर्ण भारतीयांना प्रगतीच्या पथावर नेणारा मसौदा होय. ह्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अतोनात श्रम घेतलेत आपल्या बौद्धिक कौशल्याचा सर्व दृष्टीने वापर करून भारतात गणराज्य अस्तित्वात यावे यासाठी देशाला लिखित संविधान दिले”. त्याहीपलीकडे जावून ते म्हणाले “देशात लोकशाहीच्या नावाखाली पैशाच्या जोरावर फोडा व राज्य करा ही रणनीती तयार करून केवळ श्रीमंत लोकांचीच लोकशाही मक्तेदारी झालीय मग ते विधानसभा असो वा पंचायत राज तसेच सामान्य जनतेस अतिधार्मिक बनवून त्यांची तर्कक्षमताच मारल्या जात आहे. अनुसूचित जाती, जमाती व इतर मागासवर्गीय, अल्पसंख्यांक एकत्रित राहू नये म्हणून काही राजकीय पक्ष, पुढारी सदैव वेगवेगळ्या कलकृत्या करीत असतात तर काही स्त्री- पुरुषांनी स्वघोषित अनाधिकृत टायटल स्वतःला धारण केलीत, कुणी भीमाचा वाघ तर कुणी भीमाची वाघीण तर कुणी आचार्य, गाडे अभ्यासक आदी परंतु आपण आपल्या मध्ये संविधानतज्ञ निर्माण केले नाहीत त्यामुळे भारतीय संविधानाच्या काही अनुच्छेदामध्ये झालेली सुधारणा आपण रोखू शकलो नाही अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.” कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲड.डॉ.मधुकर कोटनाके, माजी मुख्याध्यापक म्हणाले, “गावात सर्व समाजांनी एकोपा टीकावे ह्यासाठी रमेश आडे सर ह्यांनी नावीन्यपूर्ण उपक्रम सुरु करून सर्व समाजाला एक नवी दिशा दिली व सदर उपक्रम इतरही गावात राबवला तर नक्कीच बंधुभाव वाढेल” असे मनोगत व्यक्त केले. सदर कार्यक्रमास विचारमंचावर प्रमुख अतिथी म्हणून देविदास कातकर,पोलीस पाटील, लक्कडकोट, श्रीमती सजनाबाई आत्राम, सरपंच, भानुताई मुन, सदस्य, ग्रामपंचायत, दिनकर आडे, पोलीस पाटील, खिरडी, विजय कांबळे, सदस्य, नूर पटेल,तुकाराम किन्नाके, रामचंद्र कातकर,मनोज मुन, पर्वत आत्राम, बफेश पटेल उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक प्रभाकर मडावी यांनी केले तर आभारप्रर्शन श्रीमती सिमा कोरवते यांनी केले. सदर नावीन्यपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रमेश आडे, माध्यमिक शिक्षक व लक्कडकोट गावातील सुज्ञ जनतेनी अथक परिश्रम घेतले.

COMMENTS

You cannot copy content of this page